फुले दाम्पत्य सन्मान रॅलीत जिह्यातील शेकडो कार्यकर्ते झाले सहभागी!

अकोले प्रतिनिधी
माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य भरातून महात्मा फुले दाम्पत्य सन्मान रॅली काढण्यात आली या भव्य रॅली ला या
वर्षीही मोठा प्रतिसाद मिळाला पुण्यात भिडे वाडा ते महात्मा फुले स्मारक दरम्यान अतिभव्य अशी सन्मान रॅली काढून माळी एकता विजय दिवस साजरा करण्यात आला

त्यानिमित्त महाराष्ट्रातून असंख्य माळी समाजबांधव उपस्थितीत होते छत्रपती संभाजी नागपूर ,अमरावती नांदेड अहमदनगर नाशिक पुणे सातारा सांगली नगर जिल्ह्यातूनही मोठी उपस्थिती होती
अविनाश ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले दाम्पत्य सन्मान रॅलीदहा वर्षपूर्वी 200 समाज बांधवांपासून सुरू झाली आज 10 व्यां वर्षी 25 हजार पेक्षा अधिक समाजबांधव रॅली ला उपस्थितीत झाले होते अविनाश ठाकरे यांच्या नेतृवा खाली माळी महासंघाचे पुणे जिल्ह्यातील पदधिकारी, सहकार आघाडी प्रदेश उपध्यक्ष राम पानमळकर, जिल्हाध्यक्ष दक्षिण भुषणभाऊ भुजबळ, जिल्हा सचिव-गणेश धाडगे, उपध्यक्ष मनोज भुजबळ, शहर जिल्हाध्यक्ष- मनोज फुलसौदर, जिल्हा कार्यध्यक्ष-नंदकुमार नेमाने, जेष्ट आघाडी जिल्हाध्यक्ष-यादव हजारे ,जेष्ठ आघाडी उपध्यक्ष-रोहीदास हराळे, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष यश भांबरकर,कर्मचारी आघाडी जिल्हाध्यक्ष तुषार फुलारी, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष संदीप दळवी, अहिल्या नगर . जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र अनाप, महिला जिल्हा अध्यक्ष जयश्रीताई व्यवहारे, उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष रामनाथ शिंदे, जेष्ठ कार्यकर्ते दलीतमित्र भाऊसाहेब मंडलिक ,भास्कर मंडलिक, मच्छिंद्र भरीतकर नवनाथ गायकवाड राजू शिंदे किशोर झोडगे ,दिलीप ताजणे ,सुनील मंडलिक आदी शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले

———/