कविवर्य नारायण सुर्वे व सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार चे वितरण

नाशिक – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार आणि प्रेरणा पुरस्कार तसेच कविवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार वितरण सोहळा -शुक्रवार, दि.०३ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वा. कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय, (मायको हॉल) राजे संभाजी स्टेडियम शेजारी, सिंहस्थनगर, सिडको, नाशिक येथे पार पडला
कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक. वाचनालयाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार, देण्यात येतात
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार २०२५ (पुरस्काराचे स्वरूप: ₹२५,०००/- रोख, सन्मान चिन्ह, मानपत्र, शाल पुष्पगुच्छ) असे या पुरस्का पूरस्कारचे स्वरूप आहे
. शाहीर संभाजी भगत, मुंबई ,मा. अवतार सिंग (ज्येष्ठ समाजसेवक) नाशिक मा. नानासाहेब गांगुर्डे (शाहीर व कवी) पिंपळद, नाशिक, मा. हरिभाऊ अंबापूरे, (ज्येष्ठ समाजसेवक) पहिणे, त्र्यंबकेश्वर भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती, मुंबई प्रा. डॉ. मिलींद वाघ (शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच) नाशिक मा. रामदास शिवराम दोंदे (ज्येष्ठ साहित्यिक)यांना हे पुरस्कार देण्यात आले
नाशिकरोड कविवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार २०२५ पुरस्काराचे स्वरूप: ₹१०,०००/- रोख, सन्मान चिन्ह, शाल, पुष्पगुच्छ असे आहे
कादंबरी: कीड,
लेखक विशाल मोहोड, अमरावती
कथासंग्रह: हेळसांड
लेखक डॉ. अनंता सूर, यवतमाळ
कवितासंग्रह: अजान आणि चालिसा,
कवी मुबारक शेख, सोलापूर यांना हा पुरस्कार देण्यात आला
मा. उत्तम कांबळे
(ज्येष्ठ साहित्यिक, अध्यक्ष: कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय)यांच्या अध्यक्षतेखाली व मा. डॉ. रावसाहेब कसबे
(ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत) यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले