पत्रकारिता ही वंचित- शोषितांना न्याय मिळवून देणारी असावी – दिलीप बधान

व्हाॅईस ऑफ मिडिया तर्फे पत्रकार दिन साजरा
साक्री- पत्रकाराची पत्रकारिता ही समाजातील वंचित, शोषित व दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देणारी स्वतंत्र बाब आहे. पत्रकारांनी समाजातील विविध समस्यांचा अभ्यास करून निर्भीडपणे व नि:पक्षपातीपणे पत्रकारिता करून समाजाला योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आहे
पत्रकारांनी लेखणीतून अन्यायाला वाचा फोडावी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिप्रेत असलेली पत्रकारिता समाजापुढे आणावी असे मत शांताई एज्युकेशन सोसायटीचे व सेयान इंटरनॅशनल पब्लिक स्कूलचे संस्थापक दिलीप शिवराम बधान यांनी पत्रकार दिन कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
येथील सेयान इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल च्या सभागृहात पिंपळनेर पत्रकार संघटना, साक्री तालुका व्हाॅईस ऑफ मीडिया संघटना, यांच्यातर्फे मराठी पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी वाइफ ऑफ इंडियाचे साक्री तालुका अध्यक्ष राजेंद्र गवळी, कार्याध्यक्ष विशाल गांगुर्डे, मोतीलाल पोतदार,शिव व्याख्याते प्रा.प्रशांत कोतकर यांनी पत्रकार दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले
यावेळी दिलीप बधान हे या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक भूषण शेवाळे, शांताई एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी संचालक रुपेश बधान, व्हॉइस ऑफ मीडियाचे साक्री तालुकाध्यक्ष राजेंद्र गवळी, कार्याध्यक्ष विशाल गांगुर्डे,पत्रकार मोतीलाल पोतदार, उमाकांत अहिरराव,शिव व्याख्याते प्रा. प्रशांत कोतकर,प्राचार्य गणेश अहिरे तसेच फार्मसी महाविद्यालयाचे प्रा. राकेश जाधव, प्रा. गणेश खैरनार, प्रा. अश्विनी पगारे मॅडम, प्रा. संदीप पगारे प्राध्यापक वृंद यावेळी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा आकांक्षा दशपुते यांनी केले.