सुगाव फाटा ते वाशेरे घाट रस्त्याचे काम कासव गतीने

अकोले प्रतिनिधी
सुगाव फाटा ते वाशेरे घाट रस्त्याचे काम कासवगतीने
सुरू असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप संताप सहन करावा लागत आहे हे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका युवक अध्यक्ष विजयराव पवार यांनी केली आहे
सुगाव फाटा ते वाशेरे घाट- सावरचोळ फाटा पर्यंत रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे काही दिवसापूर्वी या रस्त्यावर खड्डे भरण्याचे तकलादू काम करून आणि लाखो रुपयां चा निधी ठेकेदार आणि अभियंत्यांनी संगणमताने हडप केला आणि त्यानंतर आता पुन्हा या रस्त्यावर डांबरीकरणाचे काम सुरू केले आहे
अनेक दिवसांपासून या रस्त्यावर नवीन काम केले गेले नाही यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे झाले सार्वजनिक बांधकाम विभाग अकोले १ ने या रस्तावर डांबरीकरण खडी करणं चे काम सुरू केले आहे ठेकेदाराने खडीचे ढिगारे रस्त्याच्या दोन्ही कडेला टाकलेले आहेत हे
वाहतुकीला अडथळा होत आहे तसेच कंत्राटदारांने डांबरी रस्त्यावर जेसीबीच्या साह्याने थातूर मातूर रेघोट्या मारून रस्ता खडबडीत करून ठेवला आहे याची धूळ व खडे प्रवासात लोकांच्या डोळ्यात जात आहे यामुळे अपघात होत आहे वाहनचालकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे सर्व लांबीमध्ये रस्ता खडबडीत करून ठेवल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली आहे यामुळे दुचाकी ,चार चाकी ,वाहन चालकांना तसेच मालवाहतूक ,ऊस व दूध वाहतूक यासारख्या वाहनांना अडचणींना सामना सामोरे जावे लागत आहे

सुगाव फाटा ते वाशेरे घाट या दरम्यान रस्तात काही ठिकाणी मोऱ्यांचे काम हाती घेतले आहे त्यासाठी हलक्या दर्जाचे साहित्य वापरले जात आहे सदर रस्त्याचे चांगल्या दर्जाचे काम करून तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करावे अंदाजपत्रकाप्रमाणे काम न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा आर पी आय चे तालुका युवक अध्यक्ष विजयराव पवार यांनी दिला आहे