इतर

अबीतखिंड येथे कै.बुधाबाई भोजने यांचा स्मृतिदिनी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

अकोले प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील अबीतखिंड (भोजनेवाडी) येथील आदर्शमाता कै बुधाबाई नामदेव भोजने यांचा तृतीय स्मृतिदिन व माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या स्मृती ला अभिवादन करण्यात आले

या निमित्ताने राष्ट्रीय प्रवचनकार ह भ प शोभाताई तांबे यांचा प्रवचन कार्यक्रम तसेच अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली मुंबई विभाग व सह्याद्री सेवा संघ मुंबई यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या समजसेवक,पत्रकार, व सावित्रीच्या लेकीचा सन्मान करण्यात आला

सदर प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ह.भ.प.सौ.शोभाताई तांबे (ओतूर), प्रा. सौ.मंजुषा शांताराम काळे ,श्री. नंदू गंगाधर राऊत, पत्रकार सुनील गीते , सुनील आरोटे ,रामचंद्र भोजने, गोविंद साबळे. यांना पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवराम मुढे यांचा हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी सी.बी.भांगरे , राजूर चे मा. सरपंच गणपतराव देशमुख ,इंजि, भास्कर यलमामे ,स्वामी समर्थ संस्थेचे संस्थापक शांताराम काळे, राजेंद्र मैड. ह.भ.प.पानसरे महाराज,डॉ.रामनाथ मुठे, डॉ.सुरेखा मुठे

, वीज वितरण चे श्री भोईर , सुनील सोनार, मुरलीधर गोडे, एकनाथ गोडे ,सेवा निवृत्त पोलीस अधिकारी,, डी.एम. भांडकोळी व दत्तात्रय पोरे , विजय लोहकरे लक्ष्मण भोजने, तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर जगधने रामनाथ भोजने, संगीता भोजने, अभिषेक भोजने ,एईश्वर्या भोजने, मुकीदा भोजणे , धोंडिबा भोजने , श्रीमती विठाबाई भोजने, पूजा भोजने, आदी सह अबीतखिंड , व भोजनेवाडी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होतेरामनाथ भोजने यांनी स्वागत करून आभार मानले

सदर प्रसंगी माजी मंत्री लोकनेते जलनायक स्व. मधुकरराव पिचड यांचे स्मृतींना अभिवादन करण्यात आले पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवराम मुंढे ,इंजिनीयर भास्कर येलमामे रामनाथ भोजने आदींनी स्वर्गीय पिचड यांच्या आठवणींना उजाळा दिला


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button