सौभाग्यवतींना हळदी – कुंकू,कार्यक्रमात दिले भाजीपाला ‘बीयांचे वाण..’

पद्मशाली सखी संघम व पद्मकमळ प्रतिष्ठानचा उपक्रम
सोलापूर – मकर संक्रांती ते रथसप्तमी पर्यंत महिलांना वेध लागतात हळदी – कुंकू कार्यक्रमांचे. याचबरोबर उपस्थित असलेल्या प्रत्येक महिलांना ‘वाण’ देण्याची प्रथा आहे. काळाच्या ओघात नवनवीन ‘वाण’ देण्याचे पायंडा पडू लागले. सध्या बाजारात रसायनमिश्रीत व सौम्य प्रमाणात विष असलेल्या भाजीपाला मिळत आहे. यामुळे मानवी जीवनाला आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. हे ओळखून श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन, पद्मशाली सखी संघम व पद्मकमळ प्रतिष्ठानच्या आयोजित उपस्थित असलेल्या महिला सौभाग्यवतींना हळदी – कुंकू लावून ‘वाण’ म्हणून, भाजीपाल्यांचे ‘बीयां’ देण्यात आले.
जेणेकरुन, रसायन व विषमुक्त भाजीपाला घरच्या घरी पिकवून स्वच्छ भाज्यांचे सेवन करावे म्हणून जनजागृती होण्याच्या उद्देशाने पाच प्रकारांच्या बीयां देण्यात आले होते. यामध्ये पालक, मेथी, टमाटा, हिरवी मिरची व कोथिंबीर या भाज्यांचे बीयां होत्या. मकर संक्रांती पूर्वी भाज्यांचे दर गगनाला भिडल्या होत्या. शहरातील काही भांडारातून बीयां खरेदी करुन घरच्या घरीच पिकवून, मस्त खा.. स्वस्थ राहण्याचे आवश्यक आहे तसेच याबाबत अधिक माहिती दी रोज क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्ष व परसबागेच्या संयोजिका ममता बोलाबत्तीन यांनी दिल्या.
शुक्रवारी संध्याकाळी पूर्व भागातील, दाजीपेठ येथील श्रीराम मंदिरात झालेल्या कार्यक्रमात कायद्याचे माहिती ज्ञात होण्यासाठी व मनातील भीती पळून जाण्यासाठी उपस्थित महिलांना सोप्या पद्धतीने व सविस्तर माहिती सहाय्यक सरकारी वकील विधिज्ञ शैलजा क्यातम यांनी दिले. याचबरोबर महिलांना स्वंयरोजगाराच्या संधी बाबत व उद्योजिका होण्यासाठी अधिक माहिती अनन्या महिला गृह उद्योगाच्या वतीने रेखा रुद्रोज व सायरा मुलाणी यांनी दिले. डॉ. प्रफुल्लिता काळजे यांनी, महिलांनी आरोग्य संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन करुन इतर माहिती दिले. अनन्या ग्रुप तर्फे उपस्थित असलेल्या सौभाग्यवतींना ‘वाण’ म्हणून ‘अगरबत्ती’ देण्यात आले.
कार्यक्रमानंतर शालिनी दोरनाल (कॅनडा) व सुजाता गोल्ला (मुंबई) यांच्या रोशन टी हाऊस तर्फे अल्पोपहार’ची सोय करण्यात आले होते. याप्रसंगी बालकलाकार रक्षिता तलकोकूल हिने भरतनाट्यम् सादर उपस्थितांचे मने जिंकले. सखी संघमच्या अध्यक्षा मेघा इट्टम यांनी प्रास्ताविक करुन कार्यक्रमाचे उद्देश विषद केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सखी संघमच्या समन्वयिका कला चन्नापट्टण यांनी केले. या कार्यक्रमाला पद्मकमळ प्रतिष्ठानचे संस्थापक गोपीकृष्ण वड्डेपल्ली हे सपत्निक उपस्थित होते. फाउंडेशनचे दयानंद कोंडाबत्तीनी, श्रीनिवास रच्चा, किशोर व्यंकटगिरी, श्रीनिवास पोटाबत्ती, वैकुंठम् जडल, सतीश चिटमील यांच्यासह स्त्रीरोगतज्ञ डॉ. नीता घाटे, दंतरोगतज्ञ डॉ. प्रफुल्लता काळजे यांची प्रमुख उपस्थिती होती.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्षा मेघा इट्टम, सचिवा पूजा चिप्पा, उपाध्यक्षा कल्याणी पेनगोंडा, सल्लागार ममता मुदगुंडी, कल्पना अर्शनपल्ली, समन्वयिका गीता भूदत्त, कार्यकारिणी सदस्या वनिता सुरम, पल्लवी संगा, पद्मा मेडपल्ली, सोनाली तुम्मा, हेमा मैलारी यांचे सहकार्य मिळाले, यावेळी जवळपास शंभरवर सौभाग्यवती महिला उपस्थित होते.