सोलापूरात १३५ विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी

.
सोलापूर : पद्मशाली समाजाचे कुलदैवत चिरंजीव महर्षी मार्कंडेय महामुनी, बुध्दीदेवता श्री गणेश जन्मोत्सव आणि महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन, पद्मशाली सखी संघम आणि पद्मकमळ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने लहान मुलांना ‘स्मार्टफोन मोबाइल’चे एवढे वेड लागले की, डोळ्यांना इजा होण्यापर्यंत बघत असतात. या माध्यमातून डोळ्यांना होणा-या दुष्परिणाम होण्यापूर्वी उपचार व्हावे या उद्देशाने भद्रावती पेठ येथील कै.आशय्या ईरय्या आरकाल आंध्र भद्रावती मराठी विद्यालय येथे १३५ विद्यार्थ्यांची २७० डोळ्यांची तपासणी करण्यात आले आहे.
शनिवार, ८ फेब्रुवारी रोजी भद्रावती पेठ येथील कै.आशय्या ईरय्या आरकाल आंध्र भद्रावती मराठी विद्यालयात सकाळी ११ दरम्यान विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आले आहे. नेत्ररोगतज्ञ डॉ. सोमनाथ शेटे व डॉ. रविराज जमादार यांनी तपासून मार्गदर्शन केले.

याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्षा मेघा इट्टम यांनी प्रारंभी उपस्थितांचे स्वागत करुन सत्कार केल्या. तसेच प्रास्ताविक करुन कार्यक्रमाचे उद्देश विषद केल्या. सूत्रसंचालन सदस्या हेमा मैलारी यांनी केले. फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती, श्रीनिवास रच्चा, मुख्य समन्वयक किशोर व्यंकटगिरी, वैकुंठम् जडल, श्रीनिवास पोटाबत्ती, सखी संघमच्या पल्लवी संगा, वनिता सुरम, पद्मा मेडपल्ली यांचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य मिळाले. यावेळी विद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.