इगतपुरी घोटी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा तीव्र निषेध

नाशिक प्रतिनिधी
डॉ शाम जाधव
आज दि.१०/०२/२०२५ वार–सोमवार रोजी इगतपुरी तालुक्यातील टाकेद येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारांचा तीव्र निषेध व कांचन गाव (ठाकुर वाडी)व व विद्यालीयन विद्यार्थीनी भगत व पारधी या दोघी यांचा मृतदेह शेनवड येथील पाणीपुरवठा विहीरीत आढळून आला आहे.या दोन्ही प्रकरणाचा न्यायालयीन चौकशी होऊन विशेष न्यायालयात खटला चालवून दोषींना फाशीची शिक्षा देऊन पिडीतांना न्याय मिळावा. म्हणून घोटी बाजार पेठ ते घोटी पोलिस स्टेशन मोर्चा काढण्यात आला होता.
त्यावेळी आदिवासी नारी शक्ती सेवा भावी संस्था इगतपुरी सौ नीता सुरेश वारघडे (अध्यक्ष )व सौ शकुंतला मोहन ठाकरे (सचिव) सौ संगीता अमृता आवली व शालेय पोषण आहार महीला कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने घोटी बाजार पेठ ते घोटी पोलिस स्टेशन मोर्चा काढण्यात आला होता. घोटी पोलिस स्टेशन अंमलदार यांना निवेदन देऊन पिडीतांना योग्य न्याय मिळाला नाहीतर तर रस्त्यावर उतरून निदर्शने करण्यात येतील.अशा इशारा देण्यात आला आहे.
उपस्थित आदिवासी नारी शक्ती सेवा भावी संस्था इगतपुरी संस्थापिका व शालेय पोषण आहार संघटना संस्थापिका सौ निता ताई वारघडे, सौ शालू ताई हंबीर, सौ.जया ताई भगत, सौ उज्ज्वला अवाली सौ ,मंजुळा ताई सराई, सौ संगीता ताई अवाली, सौ कामिनी ताई तोकडे, सौ सावित्रीबाई चव्हाण, सौ सोनी ताई दोरे, महीला उपस्थित होत्या. आदिवासी नारीशक्ती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था इगतपुरी यांनी आदिवासी मुलींवर झालेल्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते
