नाशिक येथे श्री प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी

नाशिक प्रतिनिधी /डॉ शाम जाधव
सुतार लोहार समाज विकास संस्था जाधव संकुल चिंचाळे शिवार सातपूर नाशिक सर्व समाज बंधु व भगिनी सहभागी होऊन श्री सत्यनारायण पूजा व पालखी सोहळा संपन्न झाला.
श्री प्रभू विश्वकर्मा पालखी पूजन संस्थेचे अध्यक्ष श्री प्रभाकर आसाराम पेंढारे व सौ मालती ताई प्रभाकर पेंढारे यांच्या हस्ते करण्यात आले. समाजभूषण डॉ अनिरुद्ध धर्माधिकारी { हृदयरोग तज्ञ } विश्वकर्मा जयंती उत्साहात सहभाग नोंदवला त्यांचा सत्कार संस्थेचे सल्लागार श्री बबनराव रामभाऊ राऊत कर यांच्या हस्ते करण्यात आला. दुपारी ३:३० महिलांसाठी हळदी कुंक वाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संस्थेच्या आजीव सभासद सौ मंगलाताई पेंढारे, सौ स्वाती राऊत, सौ माधुरी शिरसाट, सौ पुनम पवार, सौ अनिता गायकवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली हळदी कुंक व स्टील भांडे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

श्री मधुकर जाधव { माजी नगरसेवक } श्री नंदू जाधव, श्री सचिन भोर, श्री भागवत भाऊ आरोटे, श्री निवृत्ती इंगोले { समाजसेवक } श्री यशवंत पवार, श्री ज्ञानेश्वर बगडे, श्री देवकांत सोनवणे, श्री संदीप तांबे, श्री अनिल माळी यांची उपस्थिती लाभली त्यांचाही सत्कार सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थापक श्री मधुकर शिरसाट यांनी केले श्री शिवाजी सूर्यवंशी सरचिटणीस अनुमोदन सहसरचिटणीस श्री गणेश पवार यांनी केले मान्यवरांचे स्वागत सन्मान चिन्ह देऊन करण्यात आले संस्थेच्या सभासदांच्या प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी पूजा खैरनार, श्री अनिल माळी यांनी केले आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष श्री प्रभाकर पेंढारे यांनी केले समाज बंधू व भगिनींचे सर्व सभासद कार्यकारणी मंडळाचे कौतुक केले. मान्यवरांचा सत्कार खजिनदार श्री भूषण राऊत व श्री सुरेश कुवर सह खजिनदार श्री बाळासाहेब सूर्यवंशी उपाध्यक्ष, श्री शांताराम अहिरे सल्लागार, श्री मुरलीधर जगताप यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
रांगोळी प्रदर्शन सौ संगीता वाघचौरे यांनी केले त्यांचाही सत्कार करण्यात आला सायंकाळी चार वाजेला महाप्रसाद वाटप करण्यात आला ठिकाण श्री संत शिरोमणी सावता माळी मंदिर जाधव संकुल सातपूर अंबड लिंक रोड येथे करण्यात आला