श्रीक्षेत्र कोतुळेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्र उत्सवाचे आयोजन

कोतुळ प्रतिनिधी
श्रीक्षेत्र कोतुळेश्वर देवस्थान कोतुळ येथे महाशिवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी महाशिवरात्र उत्सवाला परिसरातून लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात
,सत्वशील राजा हरिश्चंद्राच्या कुशीतून उगम पावलेली खळाळत वाहणारी पवित्र मुळा नदी,च्या काठावर वसलेले कोतुळचे श्री क्षेत्र कोतुळेश्वर शिवालय अत्यंत विलोभनीय उठावदार अन् लोभस व भाविकांना भुरळ पाडणारे आहे,,,,श्री क्षेत्र कोतुळेश्वर व्यवस्थापन समितीने या शिवमंदिराची देखभाल आणि व्यवस्था अत्यंत चोख ठेवलेली दिसून येते,
महादेवाच्या मंदिर परिसरातील फुलांनी नटलेली विविध प्रकारच्या फुलांची विलोभनिय बाग, परिसरात ठेवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांनी नटलेल्या कुंड्या, नंदी मुखातून सतत प्रवाहित होत असलेले पवित्र जलकुंड भाविकांना प्रसन्न करणारा परिसर,हजारो वर्षे अबाधित असलेला भाविकांना साद घालणारा सुवर्ण पिंपळ, हाकेच्या अंतरावर असलेले ह,भ,प,वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक नितीन महाराज गोडसे यांनी स्थापन केलेले बाल वारकरी विद्यालय, सोनेरी रंगातील भव्य सतेज व्यवस्था व नुकतेच नव्याने उभारण्यात आलेले शिव पार्वती मंगल कार्यालय, स्वच्छतागृह, पार्किंग साठी विस्तृत परिसर मंदिरावरील आकर्षक विद्युत रोषणाई , विद्युत रोषणाई,सगळ्याच भाविकांना भुरळ पाडते,

तर दुसरीकडे मनमोहून टाकणारा भव्य कळस या प्रमुख गोष्टींमुळे भाविक भक्तिरसात न्हाऊन निघाल्याशिवाय राहत नाही,
विलोभनीय शिव भोलेनाथाची नागदेवता असलेली शिवपिंड, समोरच भाविकांना साद घालणारा विशाल सुरेख नंदी,मंदिरातील बैठक व्यवस्था असा सारा मोहक, बाल वारकऱ्यांनी गजबजलेला आसमंत,शिवभक्तांना वेगळीच अनुभूती देऊन जातो,
श्री क्षेत्र कोतुळेश्वर दर्शनाचा लाभ भाविकांना सुलभ होण्याचे दृष्टीकोनातून अनेक धार्मिक कार्याला वाहून घेतलेले अनेक कार्यकर्ते अहोरात्र येथे झटताना दिसतात,
या वर्षी शिवरात्र महोत्सव सलग दोन दिवस साजरा होत असून,हा, अभूतपूर्व पर्वणी योग ,समजला जातो, यात ज्ञानेश्वरी पारायण, व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, यात महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार महाराजांचा समावेश आयोजकांकडून करण्यात आला आहे, ,ह, भ,प, भास्कर महाराज रसाळ,, निवृत्ती महाराज इंदोरीकर, श्रावण महाराज जगताप, विश्वनाथ महाराज वारिंगे, भरत महाराज जोगी, स्वामी हरी चैतन्य महाराज व काल्याचे कीर्तन भागवताचार्य अशोक महाराज इलग यांच्या कीर्तनाचा समावेश करण्यात आला आहे,
संपूर्ण महाराष्ट्रात नवसाला पावणाऱ्या कोतुळेश्वर या तीर्थ क्षेत्रास महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरून अनेक भाविक अनेक दूरवरून हजेरी लावत असून यथाशक्ती दान स्वरूपात दान देतात,
दोन दिवस शिवरात्र यात्रा असल्याने भाविकांची विशेष गर्दी यावेळी पहावयास मिळणार आहे, हा विशेष पर्वणी योग असल्याचे भरत महाराज जोगी यांनी म्हटले आहे,
भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे, म्हणून पार्किंग साठी स्वतंत्र वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे, या दृष्टकोनातुन मंदिर दर्शनाची वेळ वाढविण्यात आली असून रात्री उशीरापर्यंत म्हणजेच रात्री पर्यंत दर्शनाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे, मात्र भाविकांनी रांगेत राहून नियमांचे पालन 0 आवाहन आयोजकांनी केले आहे,इ अगस्त्य ऋषींच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या अकोले तालुक्यातील कोतुळ येथील श्री क्षेत्र कोतुळेश्वर, हे पुरातन काळी कुंतलेश्वर नावाने प्रचलित असल्याची साक्ष ,जैमिनी अश्वमेध या पवित्र धार्मिक ग्रंथात असल्याचे पुरावे असल्याने, नवसाला पावणाऱ्या श्री क्षेत्र कोतुळेश्वराच्या दर्शनासाठी कोतुळ पंचक्रोशीतील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येथे वर्षभर दर्शनासाठी येत असतात, महाशिवरात्रीच्या उसाची या ठिकाणी असे भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले असून यात्रा उत्सवाचे साठी ची तयारी सुरू आहे