सांगली जिल्हातील बेकायदेशीर क्रिकेट सट्टयावर कारवाई करा- भाजप नेते दिपक माने

सांगली- जिल्हात चालणाऱ्या बेकायदेशीर क्रिकेट सट्टयावर कारवाई करणेसाठी भाजप नेते दिपक माने यांनी भारतीय जनता पार्टी सांगली यांचे वतीने पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन दिले
सागली जिल्हा मध्ये विशेषतः सांगली शहरात किक्रेट सट्टाबुकी शेटे, व कोळी टोळी यांच्या मार्फत संघटीत पणे क्रिकेटवर करोडो रुपयेचा सट्टा घेत असल्याची माहिती मिळत आहे. व आता आंतरराष्ट्रीय चँम्पियन क्रिकेट ट्रापी चालु आहे.यासाठी भागवाईस वसुली साठी खुन, हाफ मर्डर वगैरे गुन्हातील सराईत गुंड नेमले आहेत. त्यांची समाजात मोठी दहशत आहे. ते नागरिकांना युवकांना मारहाण करुन जीवे मारणेची धमकी देऊन क्रिकेट सट्टा मधील पैशाची वसुली करतात. त्यांचे दहशतीमुळे तक्रार देण्यास कोण पूढे येत नाहीत. क्रिकेट सट्टाचे करोडो रुपयाचे उलाढालीचे पश्चिम महाराष्ट्र मधील उलाढालीचे प्रमुख केद्रं बनले आहे.
या टोळीने बेकायदेशीर पणे कोटयावधी रुपये काळा पैसा मिळविला आहे. यातुन त्यांनी प्राँपटी, जागा घेतल्या आहेत.काँलेजयुवक, उद्दोगपती, व्यापारी सामान्य माणूस देशोधडीला लागुन कर्जबाजारी झाले आहेत.व्यसनाधीन होऊन शिक्षणा पासुन लांब जाऊन क्रिकेट सट्टामधील वसुलीच्या तगादा ने घरात चोरी,बाहेरही चोरी मारी करु लागले आहेत. काहींनी नैराश्यात जाऊन आत्महत्या केली आहेत. क्रिकेट सट्टातील सर्व संघटीत क्रिकेट सट्टाबुकींची चौकशी करून चौकशी अंती कठोर कारवाई करावी व सांगली जिल्हातील बेकायदेशीर क्रिकेट सट्टा बंद करावा. व बरबाद होणारी कर्जबाजारी होणारी युवापिढी ,व नागरिकांना वाचवावे अशी मागणी भाजप नेते दिपक माने यांनी कोल्हापूर परिक्षेत्र पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी व पोलिस अधिक्षक घुगे यांचे कडे केली आहे यावेळी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
.