राज्यातील कंत्राटदारांच्या मागण्यांसाठी बांधकाम मंत्री ना अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा .!

दत्तात्रय शिंदे
माका प्रतिनिधी
राज्यातील कंत्राटदारांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अत्यंत महत्त्वाचे आठ प्रमुख मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना बुधवार दिनांक २ मार्च रोजी नांदेड येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा ना अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या मागण्यासाठी दोन वर्षांपासून संघटनेने सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव व मंत्री यांच्या स्तरावर जवळपास 20 ते 25 निवेदन दिले आहे
. परंतु संबंधित विभागाचे प्रशासन ,सचिव व मंत्री महोदय यांनी घेतली नाही यामध्ये प्रामुख्याने शासकीय कामांचे देयके तातडीने देणे, निधी मंजूर केल्याशिवाय कामाची निविदा काढु नये, सगळे कामे मोठी काढुन व clubbing करूंन एकच निविदा काढून छोट्या कंत्राटदार यांचे अस्तित्व कायमचे नष्ट करणे, संबंधित रजिस्ट्रेशन यांस तीन वर्षे तातडीने मुदतवाढ देणे, तसेच १० लक्ष च्या आतील कामे मजुर सहकारी संस्था धर्तीवर सुबे अभियंता व ओपन कंत्राटदार यांना तातडीने वाटप करणे, तसेच निविदा प्रक्रिया मध्ये आमुलाग्र बदल करणे अशा आठ प्रमुख मागण्यांचा यात समावेश आहे.
राज्य संघटनेच्या दिनांक १९ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या बैठकीत आंदोलनाचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे
सदर बैठकिस महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना अध्यक्ष इंजि मिलिंद भोसले, महासचिव सुनील नागराळे,कार्याध्यक्ष संजय मैंद,राज्य संघटनेचे सर्व विभागीय अध्यक्ष सुबोध सरोदे, इंजि.समीर शेख, सुरेश कडु पाटील, प्रकाश पालरेचा, मंगेश आवळे, प्रकाश पांडव, अनिल पाटील, तसेच राज्य अभियंता संघटनेचे राजेश देशमुख महासचिव प्रशांत कांरडे , नितीन लवाळे,राज्य कंत्राटदार महासंघाचे संस्थापक संचालक निवास लाड, कांतीलाल डुबल, प्रसिद्धी प्रमुख कौशिक देशमुख उपस्थित होते.