इतर

ममताबाईंचा जिवलग बाबू हरपला …..

अकोले प्रतिनिधी

जगभर फूड मदर म्हणून लौकिक असलेल्या देवगावच्या ममताबाई भांगरे यांनी गेली दहा वर्षे संगोपन केलेला बाबू नावाचा रुबाबदार असलेला कोंबडा मुंगसांनी केलेल्या हल्ल्यात दगावला आहे. सकाळी चरायला गेलेल्या कोंबड्यांच्या कळपात बाबू अचानक मुंगसांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात दगावला.
प्राणीमात्रांवर दया करा ही शिकवण भगवान महावीर यांनी जगाल दिली. नावातच ममता असलेल्या ममताबाईंना या कोंबड्या विषयी विशेष प्रेम होते. शक्यतो कुक्कुटपालन म्हटले की मांसाहार करणाऱ्यांना मेजवानी असते .

कुक्कुटपालनाचा उद्देश सुद्धा मांसाहारी लोकांना नॉनव्हेज पुरवणे हाच असतो. ममताबाईंच्या घरी मात्र या कोंबड्याची मोठी बडदास्त ठेवण्यात आली होती. आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे ममताबाईंनी या कोंबड्यावर ममता केली होती. काही कामानिमित्त ममताबाई दौऱ्यावर होत्या. त्यांना त्यांचे पती देवराम यांनी बाबू आपल्याला सोडून गेल्याची वार्ता दिली. ममताबाईंना बाबू गेल्याची वार्ता समजताच धक्का बसला. आपल्या कुटुंबातील एक सदस्य गमावल्याचे अतिव दुःख त्यांना झाले. दुःखाचा डोंगर कोसळल्याने त्या धावत पळत आपल्या मूळ गावी देवगाव येथे पोहोचल्या. आपल्या लाडक्या कोंबड्याला म्हणजेच बाबुला छातीशी कवटाळून धायमकडून रडू लागल्या. एखाद्या पाळीव प्राण्याविषयी शेतकऱ्यांना केवढा आदर आणि आस्था असते याचे उदाहरण आजच्या प्रसंगावरून बघायला मिळाले. अत्यंत रुबाबदार व देखना असलेला ममताबाई यांचा बाबू कोंबडा परिसरातील चर्चेचा विषय असायचा. त्याची चालण्याची लकप आणि रुबाबदारपणा यामुळे प्रत्येक जण या कोंबड्याच्या प्रेमात पडायचा. अनेकदा मोठी रक्कम देऊ केलेल्या ग्राहकांना ममताबाईंनी हा कोंबडा कधीही विकला नाही. या कोंबड्याचे देवाने दिलेल्या आयुष्य जेवढे असेल तोपर्यंत मी याला सांभाळणार व कधीही या कोंबड्याला कापून देणार नाही या मतावर ममताबाई शेवटपर्यंत ठाम होत्या. आपल्या लाडक्या कोंबड्याचा अंत झाल्याचे दुःख त्यांना आवरता आले नाही. अत्यंत दुःखद वातावरणात या कोंबड्यावर भांगरे परिवाराने अंतिम संस्कार करून बाबुला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button