आहार शिजवणाऱ्या महिलेस शासनाने पूर्ण भरपाई द्यावी.- निता वारघडे,यांची मागणी.

नाशिक प्रतिनिधी /डॉ. शाम जाधव
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्राम्हणवाडा ता. त्र्यंबकेश्वर येथील शाळेत शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या सौ.सोनाली गणेश गांगुर्डे. ह्या शनिवार दि.१५/३/२०२५ रोजी शाळेत आहार शिजवत असताना प्रेशर कुकरचा स्फोट झाला आणि त्यात त्या भाजून गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांचा उपचार शासकीय रुग्णालयात सुरु आहे परंतु त्याठिकाणी उपचारात हलगर्जीपणा केला जात असल्याचे समजले आहे.

त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार करावा. होणारा खर्च शासनाने करावा आणि जोपर्यंत पूर्ण बऱ्या होत नाहीत तोपर्यंत अवलंबित कुटुंबाला शासनाने उदरनिर्वाह साठी शिधा द्यावा आणि त्यांची कधीही न भरून निघणारे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणुन शासनाने १०, ००, ००० (दहा लाख रुपये) द्यावी. अन्यथा संघटना विविध प्रकारे निदर्शने करून निषेध करेल यांस होणाऱ्या परिणामास सर्वस्वी संबंधित प्रशासन आणि अधिकारी जबाबदार राहतील. असा ईशाऱ्याचे निवेदन काल दि.१७/३/२०२५ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक व गटविकास अधिकारी त्र्यंबकेश्वर यांना शालेय पोषण आहार कंत्राटी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य. यांनी दिले यावेळी संघटनेच्या अध्यक्ष श्रीमती निता वारघडे. सचिव – संतोष भगत.शालू हाबिररीना इचम्म सावित्रा चव्हाण बाळू गावंदा कामिनी तोकडे आदी उपस्थित होते