आज चे पंचांग व राशिभविष्य दि २३/०३/२०२५

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र ०२ शके १९४७
दिनांक :- २३/०३/२०२५,
वार :- भानुवासरे(रविवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:३२,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:४०,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- फाल्गुण
पक्ष :- कृष्षपक्ष
तिथी :- नवमी समाप्ति २९:३९,
नक्षत्र :- पूर्वाषाढा समाप्ति २८:१८,
योग :- वरीयान समाप्ति १७:५८,
करण :- तैतिल समाप्ति १७:३७,
चंद्र राशि :- धनु,
रविराशि – नक्षत्र :- मीन – उ. भा.,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- मीन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,
✿राहूकाळ:- संध्या. ०५:०९ ते ०६:४० पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:३४ ते ११:०५ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ११:०५ ते १२:३६ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०२:०७ ते ०३:३८ पर्यंत,
❀ दिन विशेष:
घबाड २९:३९ नं.,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र ०२ शके १९४७
दिनांक = २३/०२/२०२५
वार = भनुवासरे(रविवार)
मेष
कौटुंबिक सौख्यात रमाल. गरज नसताना प्रवास करावा लागू शकतो. लहान मुलांच्यात रमून जाल. व्यावसायिक बदल लक्षात घ्यावेत. आवडीचे पदार्थ चाखाल.
वृषभ
ऐक्याची भावना जोपासाल. दिवस मनाप्रमाणे व्यतीत कराल. थोरांशी सल्ला-मसलत कराल. कामात चंचलता येईल. तोंडात साखर ठेवून बोलाल.
मिथुन
मोकळेपणाने बोलणे टाळाल. पत्नीचा प्रेमळ सहवास मिळेल. झोपेची तक्रार दूर होईल. संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्यावी. मानसिक संभ्रम दूर करावा.
कर्क
उगाचच चंचलता वाढेल. फार विचार करत बसू नका. मनातील इच्छेला अधिक महत्व द्याल. जोडीदाराचा हट्ट पुरा कराल. जुने विचार मनातून काढून टाकावेत.
सिंह
कलेसाठी अधिक वेळ काढाल. सर्वांच्या कौतुकास पात्र व्हाल. कामात स्थिरता ठेवावी. गप्पांमध्ये वेळ घालवाल. पोटाची काळजी घ्यावी.
कन्या
कामात जोडीदाराचा हातभार लागेल. प्रगतीची नवीन संधी उपलब्ध होईल. मुलांना नवीन गोष्टी शिकवाल. व्यायामाचे महत्व लक्षात घ्यावे. अपचनाचा त्रास जाणवेल.
तूळ
काही कामे कमी श्रमात पार पडतील. घरातील वातावरण अस्वस्थ वाटू शकते. नवीन गोष्टी आमलात आणताना विचार करावा. अचानक धनलाभ संभवतो. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.
वृश्चिक
गरज नसेल तर प्रवास टाळावा. जोडीदाराचे सौख्य वाढेल. नवीन गोष्टींकडे कल वाढेल. मोहाळा बळी पडू नका. जवळचे मित्र भेटतील.
धनू
कौटुंबिक स्वास्थ्याला प्राधान्य द्यावे. नवीन लोकांशी संपर्क वाढेल. कामाचा आनंद घ्याल. लोकोपवादाला बळी पडू नका. जुन्या कामात प्रगती कराल.
मकर
मानसिक ताण जाणवू शकतो. सतत बडबड कराल. कमिशनचा विचार आधी कराल. आवडते पुस्तक वाचाल. रागावर नियंत्रण ठेवावे.
कुंभ
तुमच्या स्मरणशक्तीचे कौतुक केले जाईल. घरातील साफसफाई कराल. काही सकारात्मक बदल कराल. आवडता छंद जोपासाल. सामुदायिक गोष्टीत लक्ष घालू नका.
मीन
उगाचच थकवा जाणवेल. सकारात्मक विचार करावेत. हस्तकलेत मन रमवावे. लबाड लोकांचा संग टाळावा. खोट्याचा आधार घेऊ नका.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर