आजचे पंचांग व राशींभविष्य दि.26/03/2025

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁
🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र ०५ शके १९४७
दिनांक :- २६/०३/२०२५,
वार :- सौम्यवासरे(बुधवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२९,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:४०,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- फाल्गुण
पक्ष :- कृष्षपक्ष
तिथी :- व्दादशी समाप्ति २५:४३,
नक्षत्र :- धनिष्ठा समाप्ति २६:३०,
योग :- सिद्ध समाप्ति १२:२५,
करण :- कौलव समाप्ति १४:५०,
चंद्र राशि :- मकर,(१५:१५नं. कुंभ),
रविराशि – नक्षत्र :- मीन – उ. भा.,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- मीन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नहीत,
शुभाशुभ दिवस:- शुभ दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी १२:३५ ते ०२:०६ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०६:२९ ते ०८:०१ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०८:०१ ते ०९:३२ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ११:०४ ते १२:३५ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०५:०९ ते ०६:४० पर्यंत,
❀ दिन विशेष:
भागवत एकादशी,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र ०५ शके १९४७
दिनांक = २६/०२/२०२५
वार = सौम्यवासरे(बुधवार)
मेष
आवडते खेळ खेळाल. मुलांशी मन-मोकळ्या गप्पा माराल. आवडीचे पदार्थ खायला मिळतील. झोपेची तक्रार जाणवेल. लहानांशी मैत्री कराल.
वृषभ
कामातून चांगला लाभ मिळेल. तुमचा खिसा भरलेला राहील. घरातील वातावरण खेळते असेल. कल्पना शक्तीला चांगला वाव मिळेल. इतरांचे भर भरून कौतुक कराल.
मिथुन
जवळच फिरण्याचा आनंद घ्याल. प्रेमाला अधिक बहर येईल. वात विकार वाढू शकतात. कामाचा आवाका लक्षात घ्यावा. वेळेचे बंधन पाळावे लागेल.
कर्क
घरगुती कामात दिवस जाईल. आपलेच म्हणणे खरे कराल. नवीन गोष्टीकडे ओढ वाढेल. मोहापासून दूर राहावे लागेल. कामात स्त्रियांची मदत होईल.
सिंह
तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. आपली योग्यता दाखवून द्याल. वादाचे मुद्दे बाजूस सारावेत. पत्नीशी मतभेद संभवतो. मुलांची समस्या दूर करावी.
कन्या
पचनाचा त्रास जाणवेल. गप्पांमधून मतभेद वाढू शकतात. धार्मिक स्थळांना भेट द्यावी. मनाची विशालता दाखवून द्याल. कलेला पोषक वातावरण मिळेल.
तूळ
कमी श्रमात कामे करण्याकडे भर राहील. शेअर्स मध्ये पैसे गुंतवाल. सासुरवाडीचे लोक भेटतील. अचानक धनलाभ संभवतो. सांपत्तिक दर्जा सुधारेल.
वृश्चिक
पत्नीचा लाडिक हट्ट पूर्ण कराल. कर्तव्याची जाणीव ठेवून वागाल. महिलांचा योग्य मान राखला जाईल. कामाचा विस्तार वाढवाल. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात.
धनू
नातेवाईकांशी मतभेद होऊ शकतात. कौटुंबिक खर्चाचे नियोजन करावे लागेल. मत्सराला मनात थारा देऊ नका. स्वभावात उधळेपणा येईल. घरगुती कार्यक्रम आखले जातील.
मकर
कामाचा वेग वाढेल. ठाम निश्चय केले पाहिजेत. पित्त विकार बळावू शकतात. अडचणींवर मात करता येईल. थोडीफार दगदग वाढू शकते.
कुंभ
बौद्धिक चलाखी दाखवाल. समय सूचकता ठेवावी लागेल. फार हटवादीपणा करू नये. उत्सुकतेने गोष्टी जाणून घ्याल. अती चिकित्सा करू नका.
मीन
सामाजिक दर्जा उंचावेल. मानाने कामे मिळवाल. तुमच्यातील उदारपणा दिसून येईल. स्वत:चे स्वत्व जपण्याचा प्रयत्न कराल. आत्मविश्वास वाढीस लागेल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर