इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि.०१/०४/२०२५

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र ११ शके १९४७
दिनांक :- ०१/०४/२०२५,
वार :- भौमवासरे(मंगळवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२५,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:४२,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- चैत्र
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- चतुर्थी समाप्ति २६:३३,
नक्षत्र :- भरणी समाप्ति ११:०७,
योग :- विष्कंभ समाप्ति ०९:४८, प्रीति ३०:०७,
करण :- वणिज समाप्ति १६:०५,
चंद्र राशि :- मेष,(१६:३०नं. वृषभ),
रविराशि – नक्षत्र :- मीन – रेवती,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- मीन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- स. ११प. चांगला दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी ०३:३७ ते ०५:१० पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ११:०१ ते १२:३३ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:३३ ते ०२:०५ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:३७ ते ०५:१० पर्यंत,

दिन विशेष:
विनायक चतुर्थी (अंगारक योग), गणपतीला दवणा व लाडूचा नैवेद्य समर्पण करणे, दग्ध २६:३३ नं., भद्रा १६:०५ नं. २६:३३ प.,

————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र ११ शके १९४७
दिनांक = ०१/०४/२०२५
वार = भौमवासरे(मंगळवार)

मेष
खाण्यापिण्याची चंगळ राहील. धार्मिक कामांकडे कल राहील. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवावीत. लेखनी जपून चालवावी. सामाजिक मान वाढेल.

वृषभ
वादा वादीचे प्रसंग टाळावेत. आर्थिक आवक चांगली राहील. उधळ पट्टीला आवार घालावी. पोटाच्या किरकोळ समस्या जाणवतील. मानसिक व्यग्रता दूर सारावी.

मिथुन
श्रद्धा व सबुरी बाळगावी लागेल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. भागीदारीत मिळतेजुळते घ्यावे लागेल. तब्येतीची हेळसांड करू नका. उपासनेतून मानसिक शांतता मिळेल.

कर्क
कोणत्याही गोष्टीचा विपर्यास करू नका. कागदपत्र नीट तपासून घ्यावीत. कौटुंबिक अडचणीतून मार्ग काढता येईल. वरिष्ठांशी जुळवून घ्या. आपली प्रतिष्ठा सांभाळावी लागेल.

सिंह
भाऊबंदकीचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी दक्षता बाळगावी. प्रकृतीची योग्य वेळी तपासणी करावी. प्रेमीकांनी अती वाहवत जाऊ नये. वरिष्ठांच्या कलाने घ्यावे लागेल.

कन्या
भागीदारीच्या व्यवसायात सबुरी बाळगा. सहकुटुंब प्रवासाचा योग येईल. छुप्या शत्रूंचा त्रास वाढू शकतो. तुमच्यातील उत्साह मावळू देऊ नका. बुद्धिकौशल्याने कामे करावीत.

तूळ
स्थावर संबंधीचे प्रश्न सोडवावेत. मुलांशी मतभेदाचे प्रसंग येतील. संघर्षाचे मुद्दे दूर सारावेत. सावधपणे व विचारपूर्वक कृती करा. कर्तव्यात व्यवहार आड आणू नका.

वृश्चिक
वैवाहिक सुखात सुधारणा होईल. क्षुल्लक कुरबुरी दूर साराव्यात. विरोधक डोके वर काढू शकतात. आळस झटकून कामाला लागावे लागेल. दुचाकी वाहन जपून चालवावे.

धनू
घरातील वातावरण खेळीमेळीचे ठेवण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराला कामात मदत करावी. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. धार्मिक कामांत मन रमवावे. कौटुंबिक खर्च वाढू शकतो.

मकर
मनातील इच्छा पूर्ण होईल. सरकारी कामाचा लाभ उठवावा. कागदपत्रांवर सह्या करताना काळजी घ्यावी. भावंडांची नाराजी दूर करावी. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल.

कुंभ
घराचे नूतनीकरण काढाल. अर्थार्जनात वाढ संभवते. कामाच्या ठिकाणी मान वाढेल. जोडीदाराच्या कमाईत वाढ होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील.

मीन
कामाचे योग्य नियोजन करावे. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. भावंडांना आर्थिक मदत कराल. मैत्रीत वितुष्टता आणू नका. सामाजिक कामात सहभाग घ्याल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button