इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि.०९/०४/२०२५

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र १९ शके १९४७
दिनांक :- ०९/०४/२०२५,
वार :- सौम्यवासरे(बुधवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१८,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:४३,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- चैत्र
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- व्दादशी समाप्ति २२:५६,
नक्षत्र :- मघा समाप्ति ०९:५७,
योग :- गंड समाप्ति १८:२५,
करण :- बव समाप्ति १०:०१,
चंद्र राशि :- सिंह,
रविराशि – नक्षत्र :- मीन – रेवती,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- मीन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,

✿राहूकाळ:- दिपारी १२:३१ ते ०२:०४ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०६:१८ ते ०७:५१ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०७:५१ ते ०९:२४ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी १०:५८ ते १२:३१ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०५:१० ते ०६:४३ पर्यंत,

❀ दिन विशेष:
घबाड ०९:५७ प., विष्णूला दवाण वाहणे,
————–

: 🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र १९ शके १९४७
दिनांक = ०९/०४/२०२५
वार = सौम्यवासरे(बुधवार)

मेष
कामाचा व्याप वाढेल. क्षुल्लक अडथळ्यातून मार्ग काढा. अति श्रमामुळे थकवा जाणवेल. बौद्धिक ताण जाणवेल. जामीन कीच्या व्यवहारात अडकू नका.

वृषभ
झोपेची तक्रार जाणवेल. मनातील निराशा बाजूस सारावी. अनाठायी खर्च करू नये. तरुण वर्गाची मते विचारात घ्याल. कामे वेळेत पार पडतील.

मिथुन
व्यावसायिक वृद्धीच्या दृष्टीने पाऊल उचलाल. आरोग्यात सुधारणा होईल. मनातील इच्छा पूर्ण होतील. चांगल्या संगतीत दिवस जाईल. किरकोळ दुखापतींकडे दुर्लक्ष करू नका.

कर्क
दिलेली योग्य वेळ पाळता येईल. मनाजोगी खरेदी करता येईल. बौद्धिक मूल्यमापन कराल. विशिष्ट धोरण ठेवून वागाल. बौद्धिक छंदांसाठी वेळ काढावा.

सिंह
मानसिक स्थैर्य जपावे. काही गोष्टींत कंजूसपणा दाखवाल. कफ विकाराचा त्रास जाणवेल. अती विचार करू नये. भागिदारीतून चांगला फायदा होईल.

कन्या
जोडीदाराच्या सुरक्षितपणाचे कौतुक कराल. सहकार्‍यांची उत्तम प्रकारे साथ मिळेल. बौद्धिक दृष्टीकोन ठेवाल. व्यापारी वर्गाला लाभ होईल. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल.

तूळ
छंद जोपासला वेळ काढाल. कौटुंबिक बाबतीत शांतता ठेवावी. जोडीदाराचा तुमच्यावर प्रभाव राहील. काही कामे विनासायास पार पडतील. शेअर्स मध्ये गुंतवणूक कराल.

वृश्चिक
तुमच्यातील धैर्य वाढीस लागेल. कर्तबगारीला नवीन वाटा फुटतील घरगुती वातावरण प्रसन्न असेल. दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्यावी. भावंडांना मदत करावी लागेल.

धनू
मागचा पुढचा विचार करून खर्च करा. गरज असेल तरच शब्दांचा वापर करा. जवळचे मित्र भेटतील. जोडीदाराशी क्षुल्लक कारणांवरून मतभेद संभवतात. कौटुंबिक खर्चाचा आकडा पुनर्विचारात घ्या.

मकर
काही गोष्टींचा चंग बांधावा. क्षुल्लक गोष्टींवरून होणारा गैरसमज टाळावा. तुमच्यातील कार्य कुशलता वाढीस लावावी. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. स्वत:साठी वेळ काढा.

कुंभ
डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी. जुनी कामे पुन्हा समोर येऊ शकतात. खर्चाचा आकडा कोलमडू देऊ नका. आधुनिक गोष्टी समजून घ्याव्यात. अघळ-पघळ बोलणे टाळा.

मीन
मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. चित्रकलेची आवड जोपासाल. मानसिक चंचलता जाणवेल. मित्रमंडळींची नाराजी दूर करावी. वादाच्या मुद्दयात अडकू नका.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button