इतर

समशेरपुर येथील बिन्नर यांचा वळू ठरला चॅम्पियन ..

अकोले/प्रतिनिधी

बारी जहागिरदारवाडी कळसुबाई यात्रा महोत्सव निमित्त कळसुबाई च्या पायथ्याशी एप्रिल महिन्यात देशी – विदेशी जनावरांचे प्रदर्शन भरवण्यात येत असून प्रदर्शनचे हे चौथे वर्ष आहे. जहागीरदार वाडी येथे दरवर्षी एप्रिल महिन्यात पेसा जहागीरदारवाडी ग्रामपंचायत , पंचायत समिती ,आदिवासी विकास विभाग आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डांगी आणि देशी –विदेशी जनावरांचे व कृषी चे प्रदर्शन भरविले होते.

या प्रदर्शनासाठी अकोले तालुक्याबरोबर इगतपुरी , संगमनेर , जुन्नर , सिन्नर आदी तालुक्यांतून हजारो जनावरे खरेदी विक्री तर काही जनावरे प्रदर्शनासाठी शेतकरी आणत असतात. सलग 3 दिवस चालणाऱ्या यात्रा महोत्सवात व प्रदर्शनात हजारो नागरिकांनी आपली उपस्थिती लावली होती. जनावरांसाठी यावर्षी वेगवेगळ्या तालुक्यातील 40 शेतकऱ्यांनी आपली जनावरे रिंगणात उतरली होती. या प्रदर्शनचे उद्घाटन तालुक्याचे आमदार डॉ.किरण लहामटे यांच्या शुभहस्ते झाले यावेळी सरपंच पंढरीनाथ खाडे यात्रा कमिटी अध्यक्ष हिरामण खाडे, पोलीस पाटील नामदेव खाडे ,युवक अध्यक्ष अक्षय आभाळे, पशुवैद्यकीय अधिकारी अशोक धिंदाळे यांचे सह सर्व सदस्य उपस्थित होते या प्रदर्शनात समशेरपुर येथील मधुकर कारभारी ढोन्नर यांचा वळू (दोनदात ) चॅम्पियन ठरला . तर वळू मध्ये प्रथम क्रमांक आदत मध्ये जालिंदर निवृत्ती गंगावणे, ढोकरी , दोन दात मधुकर कारभारी ढोन्नर, सहा दात मध्ये डांगे गोपालक संघटन वाढवली, त्र्यंबकेश्वर चार दात मध्ये किसन भाऊ गंभीरे, गंभीरवाडी ,दुभती गाय मध्ये ज्ञानदेव विठोबा कासार शरणखेल ,कालवड मध्ये दत्तू तुकाराम कोकणे शरणखेल गाभण गाय दत्तू दामू वाजे ,खेड भैरव यांची प्रथम क्रमांक निवड झाली आहे. सर्व आलेल्या नंबर यांना ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी माजी उपसभापती भरतराव घाणे, ग्रामसेवक माधव धोंगडे,बारी सरपंच वैशाली खाडे, तुकाराम खाडे ,वासळी सरपंच काशिनाथ कोरडे ,राजू काळे बाळू शिंदे आधी उपस्थित होते. सदर प्रदर्शनात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राजुर पोलीस स्टेशनचे स पो. नि. दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शक खाली डोकं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button