आजचे पंचाग व राशिभविष्य दि २८/०२/२०२२

🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन ०९ शके १९४३
दिनांक :- २८/०२/२०२२,
वार :- इंदुवासरे(सोमवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:५०,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:३४,
शक :- १९४३
संवत्सर :- प्लव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- शिशिरऋतु
मास :- माघ
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- त्रयोदशी समाप्ति २७:१६,
नक्षत्र :- उत्तराषाढा समाप्ति ०७:०२, श्रवण २९:१९,
योग :- वरीयान समाप्ति १४:२५,
करण :- गरज समाप्ति १६:२९,
चंद्र राशि :- मकर,
रविराशि – नक्षत्र :- कुंभ – शततारका,
गुरुराशि :- कुंभ,
शुक्रराशि :- मकर,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- प्रतिकूल दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०८:१८ ते ०९:४६ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
अमृत मुहूर्त — सकाळी ०६:५० ते ०८:१८ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०९:४६ ते ११:१४ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:३८ ते ०५:०६ पर्यंत,
अमृत मुहूर्त — संध्या. ०५:०६ ते ०६:३४ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
सोमप्रदोष, अमृत ०७:०२ नं. २९:१९ प., भद्रा २७:१६ नं., मृत्यु ०७:०२ प.,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन ०९ शके १९४३
दिनांक = २८/०२/२०२२
वार = इंदुवासरे(सोमवार)
मेष
वयाने लहान असणार्या लोकांशी मैत्री कराल. गप्पिष्ट लोकांच्यात वावराल. कामाचे योग्य नियोजन कराल. जोडीदाराच्या साथीत रमून जाल. इतरांना सहृदयतेने मदत कराल.
वृषभ
व्यावसायिक ज्ञान वाढवाल. लेखक, प्राध्यापक यांना प्रगती करता येईल. व्यवहारी हजरजबाबीपणा दाखवाल. हुशारीने स्वत:च फायदा काढून घ्याल. योग्य कल्पकता दाखवाल.
मिथुन
कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण राहील. तुमच्या वक्तृत्वावर लोक खुश होतील. धोरणीपणे वागणे ठेवाल. काही गोष्टींची शिस्त बाळगावी लागेल. प्रवासाची आवड पूर्ण कराल.
कर्क
भावंडांच्या वागण्याचा सखोल विचार कराल. मेंदूला जरासा ताण द्यावा लागेल. कफाचे त्रास संभवतात. अति विचारात वेळ वाया जाईल. योग्य अनुमान काढावे.
सिंह
पत्नीची व्यवहार कुशलता दिसून येईल. जोडीदाराच्या सुस्वभावीपणाचे कौतुक कराल. मानसिक स्थिरता जपावी. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. विरोधकांवर मात करता येईल.
कन्या
फसवेपणाचा आधार घेऊ नका. इतरांच्या विश्वासास पात्र व्हावे. जुनी भांडणे उकरून काढली जातील. कोणाचाही सल्ला चटकन मान्य करू नका. अविचाराने त्रास वाढू शकतो.
तूळ
बौद्धिक क्षेत्रात काम करणार्यांना दिवस चांगला जाईल. खोट्या गोष्टींचा विरोध करावा. घरगुती शांतता जपावी. प्रवास त्रासदायक ठरू शकतो. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा.
वृश्चिक
संभाषणात बाजी माराल. नवीन मित्र जोडले जातील. जवळचे नातेवाईक भेटतील. तुमच्यातील प्रेमळपणा दाखवून द्यावा. भावंडांचे वागणे विरोधी वाटू शकते.
धनू
तुमच्यातील अहंमन्यता वाढू देवू नका. मनाची चलबिचलता सांभाळावी. काही खर्च आटोक्यात ठेवावेत. वैचारिक चलाखी दाखवाल. नवीन गोष्टीत रुची दाखवाल.
मकर
स्थिर विचार करावेत. बोलतांना सावधगिरी बाळगावी. कलेसाठी वेळ काढाल. धार्मिक ठिकाणी मदत कराल. गैरसमजातून वाद वाढू देवू नका.
कुंभ
गोष्टींचे आकलन चटकन होईल. बुद्धि चातुर्याने वागाल. स्मरणशक्तीचा चांगला फायदा होईल. अभ्यासूपणे गोष्टी जाणून घ्याल. हसत-हसत संभाषण कराल.
मीन
उत्तम व्यावसायिक लाभ होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. बढतीचा योग येईल. कामाचा आवाका लक्षात घ्यावा. उधारीचे व्यवहार तूर्तास टाळावेत.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर