इतर

ठाणे कारागृहाला क्रांतीकारक राघोजी भांगरे  यांचे नाव देण्याचे आश्वासन  – आदिवासी विकास मंत्री अशोक उइके

अभ्यासक्रमात राघोजी भांगरे यांचा धडा घेण्याची मागणी

राघोजी भांगरे यांच्या १७७ व्या स्मृती दिनानिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृहात अभिवादन

अकोले प्रतिनिधी-

समाजाच्या मागणीनुसार  आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची स्मृती व त्यांचे क्रांतिकारी काम व इंग्रजाबरोबर सावकार शाही विरोधी दिलेला लढा व समाजाला दिलेले संरक्षण हे काम पाहता आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे  मध्यवर्ती कारागृह ठाणे असे नामकरण करण्याचे महाराष्ट्र सरकारकडे मागणी करण्याचे आश्वासन आदिवासी मंत्री ना.अशोकराव उईके यांनी दिले.

    दि. २ मे २०२५ रोजी क्रांतीवीर राघोजी भांगरे यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा. नाम.अशोक उइके , पालघर चे खासदार हेमंत सावरा , ठाण्याचे आ. संजय केळकर, माजी आमदार वैभवराव पिचड,कोकण विभागाचे आ. निरंजन डावखरे,  ठाणे सेंट्रल जेल अधिक्षीका भोसले मॅडम, सामाजिक कार्यकर्ते श्री किरकिरे, दत्तात्रय भूयाळ,अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव  पुणे जिल्हा अध्यक्ष गोविंद साबळे, डॉ. सुपे, डॉ. वी. वी.पोपेरे, श्रमिक संघटना ठाणेचे हंसराज खेवरा, दिलीप पटेकर, निसरट सर,दिगंबर नवाळे, पी. सी. झांबाडे (लेखक), डॉ. पराड, अशोक इरनक (सामाजिक कार्यकर्ते), संजय भांगरे(माजी सरपंच), राजेंद्र भांगरे, चेतन मेमाने (मुंबई युवा अध्यक्ष),साठे सर,भांगरे ताई, हिले ताई, सगबोर ताई, साबळे ताई, झांबाडे ताई, सदर मान्यवर समाज बांधव विविध संघटनांचे पदाधिकारी ठाणे पुणे, नगर, नाशिक, पालघर आणि रायगड या जिल्ह्यातून आलेले समाज बांधव यांनी आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांना विनम्र अभिवादन केले. 

माजी आदिवासी विकास मंत्री स्व.मधुकरराव पिचड यांनी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे ठाणे कारागृहात स्मारक उभारले,ठाणे चौकाला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे नाव दिले .राघोजी भांगरे यांचा क्रांतिकारी चळवळीचा व त्यांच्या जीवनाचा इतिहास स्व.डॉ.गोविंद गारे यांच्या कडून लिहून घेतला,त्यामुळे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे कार्य समाजापुढे आलेले आहे.यावेळी स्व.मधुकरराव पिचड यांच्या या कार्याला उजाळा देण्यात आला.

 तसेच हेमंत सावरा आपल्या भाषणात आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या नावाचा धडा शालेय अभ्यास क्रमात यावा अशी विनंती  प्रशासनाला केली.   आमदार संजय केळकर  यांनी व निरंजन डावखरे यांनी ठाणे कलेक्टर चौक  येथे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा पुतळा उभारण्याचे आश्वासन आदिवासी समाज बांधवांना दिले.

 यावेळी अनेक मान्यवरांनी हा आदर्श घेऊन नव्या पिढीने काम करावे असे मनोगत  व्यक्त केले व आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना अभिवादन केले.  सदर कार्यक्रमाचे सूत्र संचलन लकीभाऊ जाधव यांनी केले.आभार रामनाथ भोजने यांनी मानले.

माजी आदिवासी विकास मंत्री स्व.मधुकरराव पिचड यांनी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे ठाणे कारागृहात स्मारक उभारले,ठाणे चौकाला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे नाव दिले .राघोजी भांगरे यांचा क्रांतिकारी चळवळीचा व त्यांच्या जीवनाचा इतिहास स्व.डॉ.गोविंद गारे यांच्या कडून लिहून घेतला,त्यामुळे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे कार्य समाजापुढे आलेले आहे.यावेळी स्व.मधुकरराव पिचड यांच्या या कार्याला उजाळा देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button