मनोहर गंगाधर खैरनार यांचे निधन

नाशिक प्रतिनिधी
नाशिक येथील इंडिजिनस फर्मचे अध्यक्ष राहुल खैरनार यांचे वडील कै. मनोहर गंगाधर खैरनार (विरगावकर) वय ७५ यांचे शुक्रवारी दि. ०९ मे रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक होते. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे योगदान अमूल्य आणि अनुकरणीय असे होते.
नाशिक जिल्ह्यातील दसाणे, मुळाणे, विरगाव, खेडगाव आदी गावांमध्ये नोकरी करत त्यांनी ज्ञानाचा दिवा गावोगावी पेटवला. शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे, ही भावना त्यांनी कार्यातून सतत जपली. त्यांचा हसमुख स्वभाव, कर्तव्यनिष्ठा, शिस्तप्रिय आणि जबाबदारीने भरलेले जीवन तसेच शिक्षण क्षेत्रातील ठसा आजही अनेकांच्या मनावर कोरला आहे. त्यांनी घडवलेली पिढी त्यांच्या स्मृतींना आजही साक्ष देत आहे. त्यांचा दशक्रिया विधी रविवारी (दि.१८) रोजी खांदवे सभागृह, पंचवटी, नाशिक येथे करण्यात येणार आहे. त्यांच्या पशच्यात २ मुले राजेश व राहुल खैरनार, २ मुली, पत्नी व नातंवंडे असा परिवार आहे.