टाकळी विंचुर संधाननगर येथे धम्म शांती संदेश रेली ऊस्ताहात संपन्न

नाशिक प्रतिनिधी /डॉ शाम जाधव
निफाड आज दिनांक 12/5/2025 रोजी लासलगांव रेल्वे स्टेशन टाकळी विंचुर संधाननगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती ऊस्तव समीती, धम्मयांन सोशल ग्रुप भारतीय बौध्द महसभा, विशाखा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बौद्ध धम्मातील पवित्र वैशाख पौर्णिमा अर्थात तथागत भगवान गौतम बूध्द यांची 2569 वी जयंती टाकळी विंचुर संधाननगर परिसरात मोठ्या ऊस्ताहात साजरी करण्यात आली,
सर्व प्रथम लासलगांव रेल्वे गेठ ते सामाजिक सभाग्रह संधाननगर अशी धम्म शांती संदेश रेली काढुण सर्व समाजाप्रती मंगल मैत्री देण्यात आली रेली मध्ये तथागत भगवान गौतम बूध्द यांनी दिलेल्या पंघशिलेचे फलक घेऊन लहान मुलांनी चोरी न करने,खोटे नबोलने,व्यभिचार,व्यसन,हिंसा नकरण्याचा संदेश धम्म शांती संदेश रेलीतुन देण्यात आला सदर प्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती ऊस्तव समीतीचे अध्यक्ष सनी पाठक, खजीनदार मनोज केदारे, सतीष संसारे, किरण संसारे सेवा निवृत मेजर आंनदा केदारे,दौलत केदारे यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,
भारतीय बौध्द महसभेचे विठल निळे निलेश निळे यांनी धम्म वंदना घेऊन बूध्दाच्या शिकवणुकी विषयी मार्गदर्शन करून ऊपस्थीतींना शुभेच्छा दिल्या, कवी,गायक निवृती संसारे यांनी गित सादर केले, सदर प्रसंगी पहलगांम येथे झालेल्या हल्यातील नागरीक व सिमेवरील हल्यातील शहिदांना श्रध्दांजली वाहाण्यात आली कार्यक्रमाला काशीनाथ गांगुर्ड, शांताराम संसारे, मारूती कांबळे,विनोद हिरे,नारायण निळे,गौतम संसारे, सुनिल गरुड ,संतोष गवळी, विनोद आहिरे भिमराव आहिरे राहुल एळींजे, महिला मंडळाच्या संध्या निरभवने, कल्पना एळींजे ज्योती संसारे, पूजा पाठक,सुनिता शिरसाठ,सुनिता पगारे,संध्या आहिरे मंगला भालेराव, ,आदि धम्म बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सनी पाठक, मनोज केदारे, सतीष संसारे, किरण संसारे, विशाल एळींजे, संतोष गवळी, रोहित निकम, तेजस निरभवने, दिपक संसारे, राजू संसारे, कृषणा पवार,अभिजीत एळींजे, आदित्य एळींजे,आदित्य संसारे, आदीची प्रयत्न केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सुत्रसंचलन भारतीय बौध्द म महासभा निफाड तालुका अध्यक्ष प्रकाश संसारे यांनी केले तर अभार विशाल एळींजे यांनी मानले