फॅशन शो आणि नृत्य स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद ; अभिनेत्री स्मिता गोंडकर यांचाही सहभाग

युनिट फाउंडेशन चा मातृदिन महोत्सव 2025
प्रतिनिधी डॉ शाम जाधव
पुणे | १८ – सामाजिक‑सांस्कृतिक उपक्रमांत आघाडीवर असलेल्या युनिटी फाउंडेशनने मातृदिनानिमित्त भव्य “फॅशन शो व नृत्य स्पर्धा २०२५” यशवंत बॅन्क्वेट हॉल येथे आयोजित केली. विविध वयोगटांतील स्पर्धक‑मातांनी रंगतदार वेशभूषा सादर करत रॅम्पवर बहार आणली, तर नृत्यपथकांनी पारंपरिक व समकालीन शैलींना उजाळा दिला.
स्पर्धात्मक रंगत – ५०‑हून अधिक स्पर्धकांनी पारंपरिक नौवारी, फ्युजन साडी‑गाऊन्स इत्यादी वेशभूषेत फॅशन शो सादर केला. नृत्य विभागात ३० पथकांनी लोकनृत्य, कथ्थक‑फ्युजन व समकालीन सादरीकरण केले.
गणेशवंदना ताल अकॅडमी चा कल्याणी डावरे यांनी केली
कार्यक्रमाचे प्रायोजक सोन सखी जेम्स एंड ज्वेलरी , परफेक्ट ईमागे अकॅडमि वकील फिटनेस अरेना ,कॅफे टी डे ,पुरे ब्लिस बेऑटिफूल इन्सिडें अँड आऊट अशा्विनी स्किन अँड हेअर लर क्लिनिक , कुलश्री सिल्क एंड साडी
प्रमुख पाहुण्या मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री स्मिता गोंडकर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली
कार्यक्रमाचे परीक्षक निशा भंडारी ओनर ऑफ परफेक्ट इमेज अकॅडमी, निशिगंधा कापडणीस मिसेस महाराष्ट्र व सोदर्यवती विनंर, आरती दिपक जैन मिसेस बिकानेर मॉडल एंड एक्ट्रेस डांस जज सचिन ठाकूर सर यांनी केले
कार्यक्रमा मधे यशस्वी महिलाना उद्योजक पुरस्कार देण्यात आला धनश्री गायधनी,रोशनी अदमुलवर,हर्षदा पाटिल,प्रतिक्षा साळूके ,मिताली ठाकूर याना देण्यात आला
महेश भडवेसर ,डॉ अश्विनी कुशारेमॅडम गायत्री भामरे , निर्मल भंडारी सर सोनाली देशमुख,आजू खान सर ,अड विनया नागरे,दुर्गेश्वरी रूपवते, मीरा आवारे मॅडम,एश्वर्या ठाकूर उपस्तिथ होते
स्मिता गोंडकर यांच्या हस्ते तसेच ॲड. एकता कदम यांच्या सहकार्याने प्रायोजक, मान्यवर अतिथी व विजेते स्पर्धकांना शाल‑श्रीफळ व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
समारोपप्रसंगी ॲड. एकता कदम यांनी स्मिता गोंडकर, सर्व प्रायोजक संस्था व सहभागी स्पर्धकांचे मनापासून आभार मानले.
.