भरवीर खुर्द येथे भव्य दिव्य आरोग्य शिबिराचे आयोजन

नाशिक प्रतिनिधी/ डॉ. शाम जाधव
इगतपुरी.आज दिनांक 28/5/2025 रोजी भरवीर खुर्द गावात सुधाकर बहुउद्देशी सामाजिक संस्था नाशिक यांच्या तर्फे मोफत तपासणी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते
या शिबिरात गावातील वृद्ध व तरुणांची नेत्र( डोळे) तपासणी करून त्यांना अल्प दरात चष्मे देण्यात आले व रक्त ग्रुप, बी पी, सी बी सी , गुलको मिटर साह्याने शुगर तपासणी करून त्यांना औषधांचा सल्ला देण्यात आला या कार्यक्रमासाठी खालील प्रमाणे ८ तज्ञ डॉक्टरांचे टीम मार्गदर्शन लाभले

डॉक्टर प्रवीण पाटील, डॉक्टर सौ प्राजक्ता जठार ( नेत्रतज्ञ ), डॉक्टर अक्षय धात्रक, डॉक्टर सिद्धार्थ गोरे, डॉक्टर सौ दिपाली पाटील, डॉक्टर प्रिन्सि किल्ला जोसेफ, डॉक्टर समाधान पगारे, डॉक्टर किरण भागवत, डॉक्टर सौ अर्चना कडेकर व डॉक्टर शाम जाधव वरील सर्व डॉक्टर आरोग्य तपासणी करण्यासाठी उपस्थित होते व रुग्णांना अतिशय चांगल्या प्रकारे विविध आजारा विषयी माहिती देण्यात आली
मोफत तपासणी आरोग्य शिबिरासाठी भरवरी खुर्द गावातील पोलीस पाटील रमेश टोचे विकास कोकणे,रामभाऊ सारूक्ते,समाधान डावरे,रघुनाथ शिंदे,अशोक शिंदे,वनिता शिंदे अनीता शिंदे,किसन चौरे, बाळू शिंदे, दिलीप शिंदे, रंजना सारुकते, दिपाली सारुकते व महिला पैलवान प्रतिभा सारुकते आधी सर्व समस्त गावकरी उपस्थित होते व
कार्यक्रमाचे आयोजक किशोर अण्णा टोचे,भास्कर सारुक्ते,बंडू शिंदे,भाऊसाहेब सोनवणे सर्व उपस्थित होते गावातील ग्रामस्थांनी सर्व डॉक्टर लोकांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब सोनवणे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार भास्कर भाऊ सारुक्ते यांनी केले