अँड. एम.एन.देशमुख महाविद्यालयात ” मराठी भाषा गौरव दिन “संपन्न
राजूर प्रतिनिधी
कुसुमाग्रजांचा जन्मदिन २७ फेब्रुवारी हा ” मराठी भाषा गौरव दिन” म्हणून दरवर्षी महाविद्यालयात साजरा केला जातो. चालू वर्षी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन अँड. एम.एन.देशमुख महाविद्यालयातील विद्यार्थी विकास मंडळ , मराठी विभाग अकोले व देशमुख महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने दि.२८ फेब्रुवारी रोजी आँनलाईन स्वरूपात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते व लेखक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगितले.” इंग्रजी भाषेचा पगडा आपल्यावर पडला आहे तो कमी झाला पाहिजे . मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. तसेच मराठी भाषा ही सक्तीची करणे गरजेचे आहे. तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत ही अभिमानाची बाब आहे. कोणत्याही माध्यमाची शाळा असो मराठी भाषा सक्तीची करणे गरजेचे आहे. असे विचार त्यांनी यावेळी मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. द.के.गंधारे यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन मराठी भाषेचे महत्त्व सांगितले. प्रमूख पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ. आर.डी.ननावरे यांनी करून दिला. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. सुनिल घनकुटे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.डॉ. विजय काळे यांनी केले. मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख प्रा.बी.एच.तेलोरे ,प्रा.जे.डी.आरोटे,प्रा.डॉ.बी.के.टपळे, प्रा.एच.एम.काकडे, प्रा.आर.सी.मुठे, प्रा.एम.एस.साळुंके, प्रा.जे.डी.आरोटे, प्रा. डॉ. व्ही.एन.गिते, प्रा.डॉ. एल.बी.काकडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.