अकोले तालुका माहेश्वरी सभेच्या वतीने महेश नवमी उत्सव साजरा

अकोले (प्रतिनिधी) अकोले तालुका माहेश्वरी सभेच्या वतीने महेश नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
महेश नवमी निमित्त भगवान महेश यांची सुशोभित रथातून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत अबाल वृद्धांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सर्वांच्या वेशभूषेने अकोलेकरांचे लक्ष वेधून घेतले.. शोभायात्रेचा समारोप बुब श्रीराम मंदिरात महेश भगवान च्या आरती ने झाला.
महेश नवमीनिमित्त रक्तदान शिबिर, क्रिकेट व बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच दिवसभरात संपन्न झालेल्या विविध स्पर्धा सह शैक्षणिक गुणवत्तेतील विद्यार्थ्यांचा व विशेष प्राविण्य मिळविलेल्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्व कार्यक्रमाचे नियोजन तालुकाध्यक्ष विजय सारडा, सचिव विशाल राठी यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका सभेचे उपाध्यक्ष चेतन बुब, खजिनदार प्रसाद राठी, सह-सचिव आनंद मुंदडा, संघटन मंत्री नीरज मुंदडा यांनी विशेष परिश्रम घेतले.
महेश भगवान च्या शोभायात्रेत अध्यक्ष विजय सारडा, सचिव विशाल राठी, जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ मुंदडा, रामनिवास राठी, रमेश सारडा, सतीश बुब, समीर जाजू, सुरेश करवा, योगेश मुंदडा, महिला मंडळ अध्यक्ष सौ.प्रियंका बुब, सचिव सौ. तृप्ती सारडा तसेच समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.