राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यास राज्यभरातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे

अहिल्यानगर/ प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचे सारखे खंबीर नेतृत्व लाभलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाचा यंदा १० जून रोजी २६ वा वर्धापन दिन सोहळा साजरा होत आहे.g
निरंतर जनसेवेचा वसा अन् राष्ट्रवादी विचारांची कास धरत महाराष्ट्रभर यशस्वी वाटचाल करत असलेल्या पक्षाचा आनंद सोहळा मंगळवार, दिनांक १० जून २०२५ रोजी दुपारी ३ वाजता श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे – बालेवाडी, पुणे येथे पार पडत आहे
पक्षाचे नेते आदरणीय अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पक्षाची घोडदौड सुरू आहे राज्यात गतिमान विकासाची ध्येय धोरणे, कामगार,कष्टकरी, शेतकरी,कामगार तसेच व्यापारी उद्योजक महिला यांच्या विकासाच्या धोरणात्मक निर्णयात राष्ट्रवादीचा सिंहाचा वाटा आहे
राज्याच्या विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्याचे काम पक्षाचे नेते नामदार अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे पक्षाच्या या वर्धापन दिन सोहळ्यास राज्यभरातील हजारो युवक व महिला कार्यकर्ते हाजरोंच्या संख्येने सहभागी होणार आहेत
बालेवाडी, पुणे येथे पार पडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पवार पार्टीच्या वर्धापन सोहळ्यात राज्यभरातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(व्ही.जे.एन.टी.सेल) चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविकांत राठोड तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(व्ही.जे.एन.टी.सेल) चे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास धनगर, प्रदेश सरसिटणीस टीशा मढेवार ,आमदार आशुतोष काळे आमदार डॉ किरण लहामटे यांनी केले आहे