इगतपुरी तालुक्यातील भरवीर खुर्द येथे स्वस्त धान्य दुकानचे उदघाट्न

नाशिक प्रतिनिधी
इगतपुरी.तालुक्यातील भरवीर खुर्द येथे आज दिनांक १५/६/२०२५ शासनाच्या अन्न व पुरवठा विभागाचे वतीने महालक्ष्मी स्वयंसाहाय्यता समूह बचत गट मार्फत शासन मान्य स्वस्त धान्य दुकान सुरु करण्यात आले
महालक्ष्मी स्वयंसाहाय्यता महिला बचत गट यांच्याकडे सोपवलेले स्वस्त धान्य दुकान चालवण्यास प्रारंभ केला कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते श्री.भास्कर( दादा ) सारुकते यांच्या हस्ते श्री फळ फोडून धान्य वितरण करण्यात आले

महिला अध्यक्षा सौ रंजना रमेश सारुकते सचिव. सौ लहानुबाई काळु सारुकते, सी आर पी सौ मुक्ताबाई पंढरीनाथ सारुकते व बचत गटातील सर्व सदस्य सौ आरती संदीप काठे, सौ पार्वताबाई सारुकते, सौ भारती महादू सारुकते, सौ कमल सुरेश सारुकते, सौ हिराबाई बहिरू सारुकते, सौ सुमनबाई काठे,सौ लिलाबाई आढळ, सौ अंजना कचरू सारुकते तसेच भरवीर खुर्द गावातील तरुण आबाल वृद्ध तसेच श्री.प्रभाकर टोचे, श्री. समाधान डावरे, श्री.भाऊसाहेब सारुकते, श्री.कचरू सारुकते, श्री.अंबादास सारुकते, श्री.पिंटू सारुकते आदी गावकरी उपस्थित होते