मुलांचे जडणघडनीत पालकांची भूमिका फार मोलाची असते – उद्योजक विजयकुमार उडता

.
सोलापूर : मातृ देवो भव:, पितृ देवो भव: आणि आचार्य देवो भव: असे आपल्या भारतीय संस्कृतीत म्हटले जाते. मुलांचे जडणघडण होण्याकामी पालकांची भूमिका फार मोलाची असते. पालकांनी आज घेतलेल्या कष्टामुळे मुलांचे भवितव्य उज्वल ठरण्यास मदत होते, असे प्रतिपादन उद्योजक विजयकुमार उडता यांनी केले.
श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन व पद्मशाली सखी संघमच्यावतीने जागतिक पालक दिनानिमित्त कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आई वडिलांबद्दलचे मत व्यक्त करण्यासाठी आकाशाएवढा कागद आणि समुद्राच्या पाण्याएवढे शाई सुद्धा कमी पडते. मुलांचे ख-या अर्थाने काळजी घेतात व करतात फक्त ‘आईवडील’. स्वत:चा विचार न करता मुलांच्या काळजीपोटी सर्वस्व अर्पण करुन आपण जिथे आहोत, त्यापेक्षा कितीतरी पटीने मुले पुढे गेले पाहिजे या नि:स्वार्थ भावनेने वेळप्रसंगी पालक मंडळी फाटके कपडे घालून, पायात चपला न घालता मुलांना चांगले शिक्षण मिळावे या हेतूने कधी कधी स्वतःच्या शौकीन जीवनशैलीवरही प्रतिबंध करुन घेतात. म्हणूनच मुले आज उच्चस्थानी पोहोचले आहेत.
पूर्वी एकत्र कुटुंब असताना असलेली सुरक्षा आणि आनंदी आयुष्य आजच्या जमान्यात नाही. आजकाल प्रत्येकाला वाटतो की, आपण स्वतंत्रपणे जगायला पाहिजे. या हेतूने समाजात अनेक विभक्त कुटुंब होत आहेत. कालांतराने पती-पत्नीमध्ये संशय वाढून घटस्फोटापर्यंत टोकाची भूमिका घेतली जात आहे. विभक्त कुटुंब संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. ही परिस्थिती गंभीर असून असून पूर्वीप्रमाणे एकत्र कुटुंब पद्धतीची परंपरा जोपासण्याची नितांत गरज आहे.

पूर्व भागातील श्रीराम मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात रामचंद्र गाडी, रामुलू इंजामुरी व विष्णू सकीनाल या ज्येष्ठ पालकांचा सपत्निक सन्मानपत्र, गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कट्टा टेक्सटाइलतर्फे टर्किश टॉवेल तर संयोजकांच्या वतीने पेढे देण्यात आले. यावेळी शिक्षिका उमा कोटा, कला चन्नापट्टण, लता येमूल, सी.ए. चंद्रकांत इंजामुरी व मुंबईत कार्यरत असलेल्या पी.एस.आय. वरलक्ष्मी सकीनाल यांचाही सत्कार करण्यात आले.
प्रारंभी पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्षा मेघा इट्टम यांनी मान्यवरांचे स्वागत केले. समन्वयिका कला चन्नापट्टण प्रास्ताविक करुन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. उमा कोटा यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. आभार सल्लागार ममता मुदगंडी यांनी मानले.
यावेळी व्यासपीठावर सत्कारमूर्ती, मान्यवरांसह श्रीराम मंदिराचे विश्वस्त व फाउंडेशनचे सल्लागार दयानंद कोंडाबत्तीनी सह फाउंडेशनचे, सखी संघमचे पदाधिकारी उपस्थित होते. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांचे संकल्पना व मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती, सतीश चिटमील, समन्वयक किशोर व्यंकटगिरी, अंबादास कट्टा, बालाजी कुंटला, सखी संघमचे पल्लवी संगा, गीता भूदत्त, वनिता सुरम, पद्मा मेडपल्ली, विद्या श्रीगादी, कल्पना अर्शनपल्ली यांच्यासह आदींचे सहकार्य मिळाले. यावेळी लता येमूल, वैष्णवी उपलंची, रसिका मिरजकर, नागमणी इट्टम, कल्पना पामू, अनिता पेंडम यांच्यासह गाडी, इंजामुरी व सकीनाल परिवाराचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.