वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून शैक्षणिक साहित्य भेट

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
पारनेर शहरातील सामाजिक कार्यकर्ते संगम सोनवणे यांनी वाढदिवसाला अनावश्यक खर्च न करता गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.
सोनवणे प्रत्येक वर्षी वाढदिवसानिमित विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. शहरातील सनराइज् अकॅडमी येथील लष्कर भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे. खेडेगावातून आलेल्या गोर गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. या सामाजिक उपक्रम प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संगम सोनवणे, आर पी आयचे शहराध्यक्ष प्रदीप नगरे, सनराइज् अकॅडमी चे संचालक सुनील चौधरी ( सर), सुधीर सोनवणे, सचिन नगरे, आकाश ठुबे, सोमनाथ शेटे, आदी मान्यवर उपस्थित होते.