सद्गुरु सुदर्शन शेतकरी बचत गटाकडून बियाणे वाटप…

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत आत्मा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत “सद्गुरु सुदर्शन शेतकरी बचत गटा” कडून सहाय्यक कृषी अधिकारी डी एस भिवसने सहाय्यक कृषी अधिकारी डी एन उडदंगे तसेच सद्गुरु सुदर्शन शेतकरी बचत गटाचे अध्यक्ष डॉ.धर्मराज सुरोसे यांच्या हस्ते बाजरी बियाणाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी श्री डी एस भिवसने यांनी खरीप हंगाम मोहिमेबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी वि.वि सो.चेअरमन बबनराव शिंगाडे सरपंच ब्रह्मदेव आठरे,उपसरपंच जालिंदर कापसे,नानासाहेब गायकवाड विश्वनाथ पालवे,अंकुश कापसे, प्रा सिद्धार्थ आव्हाड सर महादेव बनसोडे,ताराचंद पालवे,वामन कापसे,संदीप पठाडे बन्सी पठाडे,संभाजी सांगळे, नारायण पालवे,सिताराम सुरोसे,सचिन उगले, अशोक पठाडे, बबनराव पठाडे,महादेव सुरोसे कडुबाळ सुरोसे,हरी गायकवाड आदी सद्गुरु सुदर्शन शेतकरी बचत गटाचे सदस्य उपस्थित होते.