इतर

जिताजागता अरण्यकोश काळाच्या पडद्याआड गेला – डॉ . सुनील शिंदे 

वनराईचे चालतेबोलते विद्यापीठ मारुती चितमपल्ली यांचे निधन  

  ——————————————–

  📚 अकोले  प्रतिनिधी

   ‘ जंगल वाटा , अरण्य , पर्यावरण , वनस्पती शास्त्र तसेच पक्षी निरीक्षण यासंदर्भातील सूक्ष्म निरीक्षण आणि अभ्यास असणारे खऱ्या अर्थाने ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चितमपल्ली साहेबांच्या निधनाने जिताजागता अरण्यकोश काळाच्या पडद्याआड गेला आहे ‘ असे प्रतिपादन डॉ . सुनील शिंदे यांनीकेले . 

   ज्येष्ठ साहित्यिक, पक्षी निरीक्षक पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचे निधन झाले, त्यासंदर्भात चितमपल्ली यांच्या साहित्यिक कामगिरीवर भाष्य करताना डॉ . शिंदे म्हणाले , ‘ अत्यंत व्रतस्थपणे साहित्य निर्मिती करणारे अन् अरण्य सेवा देणाऱ्या या महान साहित्यिकाने साहित्य विश्वाला जंगलवाटांची वेगळी ओळख करुन दिली आहे. वनराईचे एका अर्थाने ते चालते बोलते विलक्षण विद्यापीठ होते . त्यांची एकूणच विपूल लेखन संपदा मराठी साहित्यात संस्मरणीय स्थान निर्माण करणारी ठरली आहे . अचूक विश्लेषण आणि निरीक्षणाच्या आधारे ओघवत्या शैलीत सकस लेखन करणाऱ्या चितमपल्ली यांनी लेखनातील दर्जा परिश्रमपूर्वक सिद्ध केला . ‘    ——————————————–

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button