जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माका येथे आज जागतिक योगदिन साजरा

दत्तात्रय शिंदे
माका प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माका येथे आज जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा च्या मुख्याध्यापिका व कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश तुरभटमट सर व तसेच कार्यक्रम समन्वक प्रा. मनोज माने सर व कार्यक्रम अधिकारी प्रा. संदीप सोनवणे सर कृषी महाविद्यालय भानसहिवरे अंतर्गत कार्यरत असलेल्या कृषीदूतांनी केले होते.

कार्यक्रमाची सुरुवात सूर्यनमस्कार व ओम उच्चारानेकरण्यात आली. विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ, शिक्षक व कृषीदूतांनी विविध योगासने केली. योग प्रशिक्षक म्हणून डॉ.श्री. संतोष भुजबळ सर आणि कृषीदूतांनी मार्गदर्शन केले व योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे फायदे याबाबत सविस्तर माहिती दिली.
शाळेचे मुख्याध्यापिका सौ.अरुणा दशरथवीर व योग प्रशिक्षक डॉ . श्री संतोष भुजबळ सर यांनी विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यासाचे महत्त्व पटवून दिले. कृषीदूतांनी ग्रामीण भागातील लोकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्याचे उद्दिष्ट ठेवून हा उपक्रम हाती घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामस्थांनी कृषीदूतांचे व शाळेच्या शिक्षकवृंदांचे अभिनंदन केले.