पारनेर येथील मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर येथील मागासवर्गीय व आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय शासकीय वसतिगृह येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
योग शिक्षिका मीरा पुजारी यांनी योगाची प्रात्यक्षिक करून दाखवली व योगासनाची सविस्तर माहिती व आरोग्यासाठी होणारे फायदे यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली तर वस्तीगृहाच्या अधीक्षक करुणा ढवणे यांनी योगसनाची माहिती अतिशय योग्य पद्धतीने दिली.
आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे जरुरीचे आहे. शरीर व मन सदृढ करण्यासाठी दररोज प्राणायाम व योगासन करावीत. त्यामुळे सर्वांचा व्यायाम तर होतोच आणि मनाची एकाग्रता वाढते. वसतिगृहात योग शिक्षिका मीरा पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे योगाचे प्रशिक्षण वर्ग घेतले जाणार आहे. यावेळी छाया सोनुळे, दीपाली घागुर्डे, जनाबाई भिटे आदीसह विद्यार्थिनीनी सहभाग घेतला.