पुणेवाडी येथील भैरवनाथ विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

पारनेर प्रतिनिधी :-
आज प्रत्येकाचे जीवन हे धावपळीचे बनले आहे. सतत काम आणि तणाव या मुळे शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे मनशांतीसाठी व आपले मानसिक आरोग्य चांगले राहावे या साठी योगा करणे फार जरुरीचे आहे हेच आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधून पुणेवाडी येथील श्रीनाथ शिक्षण संस्थेचे भैरवनाथ विद्यालयात योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
.विद्यालयाच्या योग शिक्षिका मीरा पुजारी यांनी विद्यार्थ्यांना योगा विषयी सविस्तर मार्गदर्शन करून सामूहिक प्रतिक्षिक करून घेतले तर मुख्याध्यापक रामनाथ आवारी यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी श्रीनाथ शिक्षण संस्थेचे सचिव मोहन रेपाळे, उपाध्यक्ष उत्तमराव गायकवाड, सदस्य विशाल दुश्मन, विश्वस्त तुषार सोनवणे, शिक्षक शिवाजी चेडे, सरस्वती जावळे, प्रदीप ठुबे, राजू पुजारी, गोरख शिंदे, देवराम दुश्मन व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.