प्रकल्प कार्यालया मार्फत आदिवासीनां दुधाळ जनावरांचे वाटप करा – विजय पवार

अकोले प्रतिनिधी
आदिवासी भागात दुधाळ जनावरे वाटप करण्याची
मागणी अकोले तालुक्यातील युवक अध्यक्ष विजय पवार यांनी केले आहे
अकोले तालुक्यात अनेक आदिवासी कुटुंब आहेत जे नेहमी रोजगारासाठी स्थलांतर करतात तालुक्यात रोजगार नसल्याने अनेक आदिवासी बांधव जुन्नर नारायणगाव भागात रोजगारासाठी जात असतात यासाठी स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करणे आवश्यक आहे शेतीबरोबरच दूध व्यवसाय वाढविल्यास आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास हातभार लागेल दूध व्यवसाय वाढीसाठी आदिवासी भागात दुधाळ जनावरे न्यूक्लियस बजेट अंतर्गत राजूर प्रकल्प कार्यालयाने अनुदानावर वाटप करण्यात यावे अशी मागणी अकोले तालुका आरपीआयचे तालुका युवक अध्यक्ष विजय पवार यांनी केली
राजूर प्रकल्प अधिकारी राजुर यांचे मार्फत ही योजना तात्काळ अमलात आणावी यासाठी आमदार डॉ किरण लहामटे यांनी पुढाकार घ्यावा
राजुर येथील प्रकल्प कार्यालय मार्फत आदिवासी नागरिकांना न्यूक्लियस बजेट अंतर्गत अनेक प्रकारच्या व्यक्तिगत व सार्वजनिक लाभाच्या योजना दिल्या जातात परंतु या अनेक योजना सर्वसामान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही या योजनाचा आदिवासी भागातील सर्वसामान्य कुटुंबांना लाभ दिल्यास कुटुंब आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील व
अशा प्रकारचे जनावरांची वाटप केल्यास त्या गोरगरीब कुटुंबांना उदरनिर्वाह करणे अतिशय सुलभ होईल रोजगाराच्या भटकंती थांबेल व शेती ला एक चांगला जोड व्यवसाय मिळेल यासाठी प्रकल्प कार्यालयाने नेकलेस बजेट मधून आदिवासी बांधवांना दुधाळ गाई म्हशींचे वाटप करावे
मध्यंतरीच्या काळात या योजनेत गैरप्रकार झाल्याने ही योजना बदनाम झाली मात्र प्रत्यक्षात खऱ्या लाभार्थ्यांना ही योजना पोहोचल्यास आदिवासींची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही यासाठी या योजनेची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी श्री पवार यांनी विजय पवार यांनी आदिवासी विकास मंत्री व राजुर प्रकल्प अधिकारी यांच्याकडे केली आहे
–