बाळासाहेब खिलारी यांच्या संकल्पनेतून मांडवे खुर्द येथे रेशन कार्ड कॅम्प

रेशन कार्ड कॅम्प हे सर्वसामान्यांसाठी : दीपक लंके
दत्ता ठुबे
पारनेर/प्रतिनिधी :
रेशन कार्ड च्या संदर्भात अनेक समस्या आहेत. रेशन कार्ड अभावी अनेक शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही रेशन कार्ड हे एक प्रकारे आपली ओळख आहे. हे लक्षात घेऊन प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब खिलारी हे पारनेर तालुक्याच्या उत्तर भागामध्ये सर्वसामान्यांसाठी रेशन कार्ड कॅम्प घेत आहेत. या माध्यमातून सर्वसामान्यांना या कॅम्पचा लाभ होत आहे असे मत राष्ट्रवादीचे नेते दीपक लंके यांनी व्यक्त केले.
रेशन कार्ड हे नागरिकांचे ओळखपत्र असून, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी त्याची आवश्यकता आहे. याच उद्देशाने मांडवे खुर्द येथे निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून तालुकाध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांच्या संकल्पनेतून रेशन कार्ड कॅम्पचे यशस्वी आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादीचे नेते दीपक लंके आणि मांडवे खुर्दचे माजी सरपंच सोमनाथ आहेर यांच्या उपस्थितीत कॅम्पची सुरुवात झाली. ग्रामीण भागातील नागरिकांना रेशन कार्ड मिळवण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हा उपक्रम राबवण्यात आला.या कॅम्पद्वारे नागरिकांना कागदपत्रांची पूर्तता आणि नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यात आली. शेकडो ग्रामस्थांनी या कॅम्पचा लाभ घेतला.
विशेषतः ज्यांच्याकडे रेशन कार्ड नव्हते किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी होत्या, त्यांना मार्गदर्शन आणि सहाय्य मिळाले. दीपक लंके यांनी सांगितले की, रेशन कार्डामुळे गरजू कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ मिळेल आणि हा उपक्रम सामाजिक विकासाला चालना देणारा आहे. कॅम्पमध्ये सामाजिक कार्यकर्ते मोहन रोकडे, श्रीरंग रोकडे उद्योजक रवींद्र ढोकळे, लखन ठाणगे, कैलास गागरे, गौतम बागुल, सुधीर जाधव, सागर पवार, रेवन पवार, अंकुश पवार, संजय पवार, रावसाहेब गागरे, जगन्नाथ जाधव, बाळासाहेब रोहकले, संजय गागरे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. स्वयंसेवक आणि प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. कॅम्पच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामस्थांनी निलेश लंके प्रतिष्ठान आणि बाळासाहेब खिलारी यांचे आभार मानले. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेणे सोपे होत असून, सामाजिक विकासाला चालना मिळत आहे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.