पुण्यातील पालिका शाळातील नगरसेवक कोटा झाला खुला!

आम आदमी पार्टी च्या पाठपुराव्याला यश
डॉ. शाम जाधव
पुणे.- गेले तीन वर्षे पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये नगरसेवकांच्या शिफारसी नुसार भरला जाणारा कोटा रिकामा राहत होता. त्यामुळे *आम आदमी पार्टीचे मनोज शेट्टी व श्रद्धा शेट्टी यांनी या विषयाचा पाठपुरावा केल्यावर आता प्रशासनाने हा पट खुल्या पद्धतीने भरावा असा आदेश काढला आहे
शहरात महानगरपालिका आणि आकांक्षा फाउंडेशन संयुक्त विद्यमाने पाच शाळा चालवितात यामध्ये काही जागा नगरसेवकांच्या शिफारसीनुसार भरल्या जातात परंतु गेल्या तीन वर्षात निवडणुका न झाल्यामुळे नगरसेवक पद रिक्त आहेत आणि त्यामुळे काही मुलांचे प्रवेश रखडले होते यासंदर्भात आता आम आदमी पार्टीच्या मागणीनुसार या जागी तातडीने लॉटरी मधील प्रतीक्षा यादीतील मुलांना प्रवेश देण्यात यावेत असा आदेश मनपा उपायुक्त विजयकुमार थोरात यांनी काढला आहे.
आता यामुळे साठ मुलांना हे प्रवेश मिळतील. या संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क येथील कस्तुरबा गांधी इंग्रजी विद्यालय व येरवडा परिसरातील मातोश्री इंग्रजी शाळेमध्ये आता हे प्रवेश शाळेने सुरू केले आहे

पुण्यात संयुक्त पणे आकांक्षा फाउंडेशन पाच शाळा तर आयटीच फाउंडेशन सात शाळा चालवतात. शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांना त्यांच्या नजीकच्या अंतरात शाळा उपलब्ध करून देणे ही पालिकेची जबाबदारी आहे. त्यामुळे अशा पद्धतीने नगरसेवकांसाठी राखीव शाळा प्रवेश बेकायदेशीर असून ही तरतूद यापुढे गैरलागू करावी अशी ही मागणी आपचे मुकुंद किर्दत यांनी केली आहे.