शेणित येथे राजा हरिश्चंद्र माध्यमिक विद्यालयात शालेय साहित्याचे वाटप

अकोले प्रतिनिधी
राजा हरिश्चंद्र माध्यमिक विद्यालय ठोकळवाडी शेणीत( ता अकोले) येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
ग्रामीण भागातील शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमीच मदतीचा हात देणारे श्री लालू धोंगडे, श्री रमेश भांगरे, श्री भाऊराव भांगरे, श्री विठ्ठल तळपे, श्री पंढरीनाथ धोंगे, डॉ.श्री दीपक डामसे, श्री अरुण पवार या दानशूर व्यक्तींच्या मदतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित करताना श्री रमेश भांगरे सर म्हणाले ” या शाळेतील शिक्षक मेहनतीने व कष्टाने ज्ञानदानाचे काम चांगल्या प्रकारे करतात. म्हणून मार्च परीक्षेत प्रतीक्षा मुंढे 88 %, महेश धराडे 87% आणि नीलम भांगरे 74% मिळवून अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकावला. त्यांच्या यशामध्ये शिक्षकांचा फार मोठा वाटा आहे.

आपल्याला पुढे काय व्हायचे आहे ते आत्तापासून ठरविले पाहिजे. डॉक्टर इंजिनीयर वकील आयपीएस अधिकारी व्हायचे असेल तर मोबाईल पासून दूर राहिले पाहिजे. जर मोबाईल वापरत असाल तर त्याचा उपयोग अभ्यासासाठी व माहिती मिळवण्यासाठी करा, गेम खेळण्यासाठी अजिबात करू नका. गरीब घराण्यात जन्माला येऊन मोठ्या कष्टाने शिक्षण घेतले, मी खूप हुशार होतो डॉक्टर,वकील, इंजिनियर झालो असतो परंतु उपाशीपोटी राहून माझे ध्येय मी साध्य केले. कुंभार जसा मातीला आकार देतो तसे शिक्षकांमुळे विद्यार्थी घडले जातात. तेव्हा शिक्षकांच्या आज्ञेचे पालन विद्यार्थ्यांनी केले पाहिजे. इमारत सुंदर असण्यापेक्षा ज्ञानदान श्रेष्ठ आहे असे त्यांनी सांगितले व शाळेसाठी मदत करण्यास केव्हाही आम्ही तत्पर राहू अशी ग्वाही श्री भांगरे यांनी दिली.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रानकवी श्री तुकाराम धांडे यांनी नववीच्या पाठ्यपुस्तकातील ‘वनवासी’ कविता विद्यार्थ्यांना गाऊन मनमुग्ध केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे खजिनदार श्री मुरलीधर तळपे, रानकवी श्री तुकाराम धांडे, श्री लालू धोंगडे यांच्या मातोश्री हौसाबाई धोंगडे, ग्रामपंचायत सदस्या सौ.सुनीता लांघी, श्री रमेश भांगरे, श्री भाऊराव लांघी. श्री ज्ञानेश्वर तळपे, श्री भारमल, श्री तुकाराम बेनके, श्री विजय बढे, श्री पोपट भांगरे श्री नारायण धोंगडे, श्री अशोक लांघी, व ग्रामस्थ उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब दातीर सरांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व श्री संतु जाधव सर यांनी उपस्थित आमचे आभार मानले.
———