वृध्दाश्रमाच्या प्रांगणात रोटरीतर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न

नाशिक दि 8
नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब)संचलित बेळगाव ढगा येथील अंध ज्येष्ठ ,ज्येष्ठ नागरिक आणि अंध विद्यार्थी वसतीगृह व वृद्धाश्रमाचा प्रकल्प पूर्णत्वास येत असून तेथे लवकरच राहण्यासाठी येणाऱ्या अंध ज्येष्ठांना व अंध विद्यार्थ्यांना पर्यावरण पूर्वक प्रसन्न अशा वातावरणात आपले आयुष्य प्रसन्नतेने जगता यावे या हेतूने व सामाजिक बांधिलकीच्या भावनेने रोटरी क्लब ऑफ नाशिकने या वसतीगृहाच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न केला.
रोटरी क्लब ऑफ नाशिक दरवर्षी पर्यावरण पूरक अनेक प्रकल्प राबवित असते. त्या प्रकल्पाचा एक भाग म्हणून सदर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे उद्गार रोटरी क्लब आॅफ नाशिकचे अध्यक्ष डॉ.गौरव सामनेरकर यांनी काढले.
‘नॅब’च्या अध्यक्षा अॅड विद्युल्लता तातेड यांनी सुरुवातीला सर्व रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्यांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. ‘नॅब’चे संस्थापक अध्यक्ष अॅड.प्रकाशचंद्र सुराणा व सेक्रेटरी शितल सुराणा यांनी ‘नॅब’ च्या कार्याची माहिती दिली. वृक्षारोपण कसे करावे व वृक्ष कसे जगवावेत यासंबंधी दत्तू ढगे यांनी उपस्थितांना माहिती दिली.

यावेळी रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या सेक्रेटरी रेखा पटवर्धन अॅड .राजश्री बालाजीवाले, भरत बिरारी, विजय दीक्षित, दिलीप सिंग बेनिवाल ,अनिल सुकेणकर, माजी अध्यक्ष ओम प्रकाश रावत , मंगेश अपशंकर ,स्मिता अपशंकर ,मोना सामनेरकर,ॲड.कांतिलाल तातेड राजेंद्र डूंगरवाल, मोहनलाल लोढा, हेमंत देशपांडे, विष्णू ढगे,अनिल खालकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित देशपांडे व आभार प्रदर्शन रेखा पटवर्धन यांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे उपाध्यक्ष हेमराज राजपूत व विजय दीक्षित यांनी परिश्रम घेतले.