वीज क्षेत्रातील खाजगीकरण धोरणांना तीव्र विरोध , कामगार महासंघ उतरला रस्त्यावर

पुणे दि 12 शुक्रवार, दिनांक 11 जुलै 2025 रोजी, रास्ता पेठ पुणे येथे दुपारी 1.30 वा. महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या वतीने पारेषण व वितरण झोन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य निषेध द्वार सभा आयोजित करण्यात आली. सभेला वितरण व पारेषण कंपनीतील विविध शाखांमधील सुमारे 500 पेक्षा जास्त कामगार सभासदांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
या द्वार सभेत महाराष्ट्रातील वीज क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या खाजगीकरणाच्या धोरणांचा, विशेषतः समांतर वीज परवाना, फ्रँचाईझी योजनेचा व वितरण क्षेत्रात खासगी कंपन्यांना दिल्या जाणाऱ्या प्रवेशाचा तीव्र निषेध करण्यात आला.
सभेत संयुक्त कृती समितीच्या संपात महासंघ का सहभागी झाला नाही या प्रश्नाचे स्पष्टीकरण देत, महासंघाने आपली भूमिका स्पष्ट केली. प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय न झाल्यास, महासंघ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा सुरेश जाधव, विजय हिंगमिरे यांनी मार्गदर्शन करताना देण्यात आला.
विजय हिंगमिरे – विभाग प्रमुख,सुभाष सावजी – वरिष्ठ मार्गदर्शक,सुरेश जाधव – सह संघटन मंत्री, तुकाराम डिंबळे – महावितरण कार्याध्यक्ष,अरुण महाले – प्रादेशिक सचिव,विश्वास भैरवकर – पारेषण कार्याध्यक् श्री अभंग वितरण कोषाध्यक्ष,श्री सुनील सोमवंशी, श्री शेखर मारणे (झोन अध्यक्ष), श्री खिरोडकर (झोन सचिव),श्री राजू साळवी (पारेषण सचिव) यांनी यावेळी मार्गदर्शन केले

श्री जनार्दन शिवरकर, विजय जाधव, संदीप दरेकर, राहुल गोवर्धन यांनी संयोजन केले. मंचरचे अध्यक्ष नितेंद्र नाईकवाडी, प्रसिद्धी प्रमुख सचिव गायकवाड, सागर कांबळे,श्री शिरसाठ (बंडगार्डन), खोचे (नगर रोड), प्रवीण जुमळे, पराग वाणी,सूत्रसंचालन: श्री खिरोडकर,आभार प्रदर्शन झोन उपाध्यक्ष सुनील भोसले यांनी केले.
सरकार ने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल , असा ईशारा यावेळी दिला