इतर

ट्रक जाळुन इन्शुरंन्स व फायनान्स कंपनीला फसविण्याचा डाव फसला!

खोटी फिर्याद देणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

विलास तुपे

राजूर प्रतिनिधी

ट्रक जाळुन इन्शुरंन्स व फायनान्स कंपनीला फसविण्याचा डाव राजुर पोलीसांनी लावला उधळुन आहे

सागर बाबुराव नवले वय ३१ वर्षे रा. राजमाता मंगल कार्यालय, स्वच्छंद बंगला, राजबिहारी रोड म्हसरुळ नाशिक याने पोलीस स्टेशनला येवुन खबर दिली की, दिनांक १७/०७/२०२५ रोजी रात्री २ / ३० वा. चे सुमारास माझे मालकीचा cng गॅसवर चालणारा ट्रक नं. MH १५HH५८८७ हा संगमनेर वरुन घोटीला माझा ड्रायव्हर विशाल उत्तम रनशेवरे रा. नाशिक हा घेवुन जात असताना तो ट्रक चालवित विठा घाटात आला असता तेथे ट्रकला अचानक आग लागुन त्या आगीत ट्रक जळुन नुकसान झाले आहे.सदर खबरीवरुन राजुर पोलीस स्टेशनला अकस्मात जळीत रजी.नं.४/२०२५ प्रमाणे दाखल आहे.

सदर जळीतामधील साक्षीदार लोकांकडे श्री. दिपक सरोदे सहा. पोलीस निरीक्षक, यांनी चौकशी केली असता संशय आल्याने त्यांनी जळीत घडले ठिकाणी दोन पंचासमक्ष जावुन जळालेल्या वाहनाची पाहणी केली असता सदरचा मालवाहतुक सी. एन. जी. ट्रक हा जळाला नसुन तर तो कोणीतरी जाळुन टाकला आहे असे चौकशीत निष्पन्न झाल्याने

सपोनि दिपक सरोदे सो., पोहेकॉ / श्रीकांत नरोडे, मपोना / संगिता आहेर, पोकॉ अशोक गाढे यांनी सदर जळीत मधील साक्षीदार लोकांकडे कसोशीने चौकशी केली असता सदरचा सी. एन. जी. ट्रक हा ट्रक मालक सागर बाजीराव नवले याने त्याचे साथीदार १) विशाल उत्तम रनशेवरे २) अमोल शरद बारगजे ३) लहु शंकर आव्हाड यांचे मदतीने इन्शुरंन्स कंपनीचे पैसे मिळविण्यासाठी व फायनान्स कंपनीचे हाप्ते बुडविण्यासाठी टाटा कंपनीचा ब्राऊन रंगाचा ट्रक नं. MH १५HH५८८७ हा राजुर पोलीस स्टेशनचे हद्दीत विठे घाटात सुनसान ठिकाणी आणुन बारदानाच्या गोण्या टाकुन लायटरचे सहाय्याने पेटुन देवुन पोलीस स्टेशनला ट्रक जळाला आहे 

याबाबत खोटी खबर दिली आहे. यावरुन सदर आरोपीतां विरुध्द राजुर पोलीस स्टेशनला गु.र.नं. ३०१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३२६(फ), २४०, ३(५) प्रमाणे दिनांक १८/०७/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढिल तपास सपोनि दिपक सरोदे हे करत आहेत.

सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर, मा. श्री. सोमनाथ वाकचौरे, अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर, मा. श्री. कुणाल सोनवणे, संगमनेर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सपोनि दिपक सरोदे, पोहेकॉ श्रीकांत नरोडे, मपोना संगिता आहेर, पोकॉ अशोक गाढे हे करत आहे.

————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button