इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.२०/०७/२०२५,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ २९ शके १९४७
दिनांक :- २०/०७/२०२५,
वार :- भानुवासरे(रविवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:०४,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०७:०७,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर वर्षाऋतु
मास :- आषाढ
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- दशमी समाप्ति १२:१४,
नक्षत्र :- कृत्तिका समाप्ति २२:५३,
योग :- गंड समाप्ति २१:४८,
करण :- बव समाप्ति २२:५७,
चंद्र राशि :- वृषभ,
रविराशि – नक्षत्र :- कर्क – पुष्य,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- वृषभ,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- कृत्तिका वर्ज्य दिवस,

✿राहूकाळ:- संध्या. ०५:२९ ते ०७:०७ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:२० ते १०:५८ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी १०:५८ ते १२:३६ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०२:१३ ते ०३:५१ पर्यंत,

❀ दिन विशेष:
घबाड १२:१४ प., भद्रा १२:१४ प., एकादशी श्राद्ध,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ २९ शके १९४७
दिनांक = २०/०७/२०२५
वार = भानुवासरे(रविवार)

मेष
लिखाण करण्यास चांगला दिवस. नवीन तांत्रिक बाबींची जाणीव करून घ्यावी. मानसिक प्राबल्य वाढवावे लागेल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. अनाठायी घराबाहेर पडू नका.

वृषभ
जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. तुमची गरज भागवली जाईल. मनावर फार ताण घेऊ नका. भागिदारीतून चांगला नफा मिळेल. घरातील सर्वांशी मिळून-मिसळून वागावे.

मिथुन
कामाचा फार बोभाटा करू नका. हाताखालील लोक सहाय्यक ठरतील. प्रलोभनापासून दूर राहावे. लपवाछपवीची कामे करू नका. घरगुती खर्च वाढू शकतो.

कर्क
चैन करण्याकडे अधिक कल राहील. मुलांशी हितगुज कराल. भागीदारीत फार अवलंबून राहू नका. मन विचलित होणार नाही याची काळजी घ्यावी. वरिष्ठ नाराज होणार नाहीत याची काळजी घ्यावी.

सिंह
व्यायामाला कंटाळा करू नका. वाहन चालवताना काळजी घ्यावी. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. नवीन उर्जेने कामे तडीस न्याल. जवळचे मित्र भेटण्याची शक्यता.

कन्या
नातेवाईकांमध्ये कौतुकास पात्र व्हाल. वादावादीच्या मुद्दयात सहभाग होऊ नका. वचन करण्यावर भर द्या. पराक्रमाला चांगला वाव मिळेल. वरिष्ठांच्या कडून कौतुकास पात्र व्हाल.

तूळ
विसंवादाला थारा देऊ नका. मनात कोणतेही आधी बाळगू नका. जुनी येणी प्राप्त होतील. प्रयत्नांना यश मिळेल. कौटुंबिक वातावरण तुमच्या मर्जीप्रमाणे राहील.

वृश्चिक
अंगीभूत कलेला वाव द्यावा. केलेली धावपळ सार्थकी लागेल. कामे हातावेगळी केल्याचा आनंद लाभेल. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. वडीलधार्‍यांचा मान राखावा.

धनू
उद्दीष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करावा. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल. घरगुती वातावरण चिघळू देऊ नका. संयमाने कामे कराल.

मकर
गरज असल्यासच बाहेर पडा. जुनी देणी भागवली जातील. जवळच्या मित्रांचा सहवास लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. प्रेम सौख्यात वाढ होईल.

कुंभ
औद्योगिक स्थिरता लाभेल. घरात काही जुजबी बदल कराल. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते. दिवस आनंददायी ठरेल. कोणावरही फार विसंबून राहू नका.

मीन
तुमच्या ज्ञानात भर पडेल. निसर्ग सौंदर्याचे आकर्षण निर्माण होईल. बर्‍याच दिवसांनी जवळचे मित्र भेटतील. वरिष्ठांचा विरोध सहन करावा लागेल. बोलण्यात गोडवा ठेवावा.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button