आजचे पंचांग व राशी भविष्य दि.२२/०७/२०२५

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ ३१ शके १९४७
दिनांक :- २२/०७/२०२५,
वार :- भौमवासरे(मंगळवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:०५,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०७:०६,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर वर्षाऋतु
मास :- आषाढ
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- द्वादशी समाप्ति ०७:०६, त्रयोदशी २८:४०,
नक्षत्र :- मृग समाप्ति १९:२५,
योग :- धृव समाप्ति १९:२५,
करण :- गरज समाप्ति १७:५२,
चंद्र राशि :- वृषभ,(०८:१५नं. मिथुन),
रविराशि – नक्षत्र :- कर्क – पुष्य,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- वृषभ,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- क्षयतिथी वर्ज्य दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०३:५१ ते ०५:२९ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी १०:५८ ते १२:३६ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:३६ ते ०२:१३ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:५१ ते ०५:२९ पर्यंत,
❀ दिन विशेष:
भौमप्रदोष, संत नामदेव समाधि सोहळा, सिंहायन १८:५९, भद्रा १८:४० नं., यमघंट १९:२५ नं.,
————–:
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ ३१ शके १९४७
दिनांक = २२/०७/२०२५
वार = भौमवासरे(मंगळवार)
मेष
आज काहीतरी वेगळं शिकायला मिळेल. अभियांत्रिकी क्षेत्रामधील व्यक्तींना लाभ होईल. वेळेचा अपव्यय करू नका. धार्मिक कामात मन गुंतवाल. परिस्थितीत सुधारणा होईल.
वृषभ
ताण व त्रस्तता घालवावी. कामाचे योग्य नियोजन व नियंत्रण हवे. दूरदृष्टीतून सकारात्मकता साधावी. नवीन संधीकडे लक्ष ठेवावे. टीकाकारांकडे दुर्लक्ष करावे.
मिथुन
एकतर्फी वाद वाढवू नका. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. वरिष्ठांची नाराजी सहन करावी लागेल. योग्य कृतीतून ताण हलका होईल. सर्वांशी गोड बोलण्याचा प्रयत्न कराल.
कर्क
खाद्यपदार्थात रमून जाल. पोटाचे विकार सतावतील. मनातील निराशा दाटून येऊ शकते. करियर संबंधी निर्णय सारासार विचारातून घ्यावेत. घराबाहेर वावरतांना काळजी घ्यावी.
सिंह
उत्तम व्यावसायिक लाभ होईल. चांगल्या संगतीचा लाभ घ्यावा. प्रयोगशील राहावे लागेल. आपल्या ज्ञानात भर पडेल. नोकरदारांची समस्या मिटेल.
कन्या
आराम हराम आहे, हे ध्यानात घ्यावे. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. उगाचच चिडचिड करू नका. हाती घेतलेल्या कामावर लक्ष केन्द्रित करावे. नियोजनात फारसा बदल करू नका.
तूळ
काही कामे त्वरेने आवरती घ्याल. सरकारी कामे पुढे सरकतील. मन प्रसन्न राहील. कामात ध्येय गाठण्याचा प्रयत्न कराल. कामाच्या स्वरुपात बदल करण्याचा विचार कराल.
वृश्चिक
जुन्या निर्णयावर पुनर्विचार करावा. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. कमी वेळेत कामे पार पडतील. तुमच्या मदतीची जाणीव ठेवली जाईल. महत्त्वाचे कागद जपून ठेवावेत.
धनू
कामात काहीसा उत्साह जाणवेल. निर्णय चांगले संकेत देतील. घरगुती कामावर भर द्याल. जोडीदाराशी चांगली चर्चा होईल. एकमेकातील एकोपा वाढेल.
मकर
व्यावसायिक गणित जुळेल. तणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा. मनाची चंचलता दूर सारावी. धार्मिक ग्रंथ वाचन चालू करावे. हातात काही नवीन कामे पडतील.
कुंभ
जवळचे मित्र समजून घेतील. बोलताना भान राखावे. अन्यथा नुकसान संभवते. चांगली संगत ठेवावी. हतबल होण्याची आवश्यकता नाही.
मीन
आर्थिक बाजू सुधारेल. समाधानकारक घटना घडतील. अनोळखी व्यक्तींचा त्रास करून घेऊ नका. योग्य ताळमेळ साधणे गरजेचे आहे. व्यावहारिक निर्णय घ्यावे लागतील.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर