सकाळ पतपेढीच्या अध्यक्षपदी अरुण सुर्वे बिनविरोध

पुणे, ता. २४ : सकाळ प्रेस कामगार सहकारी पतपेढीच्या
अध्यक्षपदी ‘सकाळ’चे मुख्य उपसंपादक अरुण रमेश सुर्वे यांची, तर सचिवपदी सुनील जगताप यांची बिनविरोध निवड झाली.
पतपेढीच्या संचालक मंडळाच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. २०२५ २०२६ या वर्षासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
अन्य पदाधिकारी पुढील प्रमाणे उपाध्यक्ष राहुल कामठे, खजिनदार अशोक बोडखे, सहसचिव- रेणू मेमाणे. सकाळ पतपेढीची वार्षिक उलाढाल १३ कोटी रुपयांची आहे. पतपेढीने ७१ वर्षे पूर्ण केली आहेत. पतपेढीमार्फत सभासदांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्य जातात. राज्यभरात विविध जिल्ह्यांत पतपेढीचे सभासद आहेत.
गेल्या आर्थिक वर्षासाठी पतसंस्थेने सभासदांना १३ टक्के लाभांश वाटप केले. अल्प मुदत कर्ज ८० हजार रुपयांपर्यंत व दीर्घ मुदत कर्ज १२ लाख रुपयांपर्यंत दिले जाते. दीर्घ
कर्जावर एलआयसीची विमा सुरक्षा योजना असून, सेवेत असलेल्या सभासदाचा मृत्यू झाल्यास वारसाला सुपंथ योजनेअंतर्गत एक लाख रुपयांची मदत दिली जाते.
पतसंस्थेचे अध्यक्ष सुर्वे हे मुळचे संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील रहिवाशी आहेत त्यांच्या निवडीचे अनेकांनी अभिनंदन केले आहे