भायगाव सेवा संस्थेचे निवडणुक बिनविरोध!

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील राजकिय दृष्टया महत्वाची समजली जाणारी भायगाव येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेची निवडणुक बिनविरोध पार पडली. संस्थेची सुत्रे सत्ताधारी गटाच्या ताब्यात ठेऊन विरोधी गटाला दोन जागा देण्यात आल्या. लोकनेते मारूतराव घुले यांच्या सहकारातील विचारसरणीचा आदर्श ठेवत निवडणूक बिनविरोध केल्यांची भावना गट प्रमुखांनी व्यक्त केली. गावात दोन्हीही गट राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या घुले कुंदुंबाच्या बरोबर आहेत.बिनविरोध निवड झालेल्या मध्ये सर्वसाधारण कर्जदार प्रवर्गातुन – कल्याण केशव आढाव, विठ्ठल कुंडालिक लांडे, विठ्ठल रमेश आढाव, अशोक कचरू आढाव, रमेश एकनाथ आढाव, लक्ष्मण रामदास शेकडे, संदिप कडुबाळ दुकळे, रामेश्वर जयवंत दुकळे
महिला राखीवतुन- सौ. आशादेवी लक्ष्मण लांडे, सौ. सुनिता कैलास लांडे
इतर मागास प्रवर्गातुन – पांडुरंग मुरलीधर आढाव
भ. वि.जा. जमाती प्रवर्गातुन – अंबादास पंढरीनाथ सांगळे
अ.जा. / अ.ज. प्रवर्गातुन – संजय हरिचंद्र कानडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी एस. एस. थोरात, व सहाय्यक निवडणुक अधिकारी म्हणुन भायगाव सेवा संस्थेचे सचिव काकासाहेब विखे यांनी जाहिर केले. या निवडीचे लोकनेते मारूतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. राजश्रीताई घुले पाटील व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांनी अभिनंदन केले आहे .
– निवडणुकितुन माघार…
ज्ञानेश्वर शेषेराव दुकळे, अॅड. सागर हरिचंद्र चव्हाण, सौ.मिनाक्षी कल्याण आढाव, सौ.जयश्री रमेश दुकळे, सुरज खंडेराव देशपांडे, अमोल रावसाहेब देशपांडे, गणेश लक्ष्मण निमसे, सोपान नामदेव लांडे, उध्दव बाळासाहेब दुकळे, शहाराम चंद्रभान आगळे, सुनिल महादेव शेकडे, संतोष एकनाथ दुकळे, चांगदेव बाबुराव कदम, देवीदास मोतीलाल तांबेरे यांनी निवडणुकीतुन माघार घेतली.