सुरेशराव कोते सुर्यदत्त नॅशनल अवार्ड 2022 पुरस्काराने सन्मानित!

कोतुळ प्रतिनिधी
लिज्जत पापड चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेशराव कोते यांना पुणे येथे आज सुर्यदत्त नॅशनल अवार्ड पुरस्कार 2022 देऊन सन्मानित करण्यात आले पुणे येथील ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट च्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला कर्नाटका राज्याचे गव्हर्नर ठावरचंद गेहलोत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी सुर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते
श्री सुरेशराव कोते यांना मागील महिन्यात सोशल फाऊंडेशन, पुणे, महाराष्ट्र चा या वर्षीच्या ‘कर्तव्यम् प्रेरणा पुरस्कार-2022’ या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित झाले
दिनांक २२ फेब्रुवारी, २०२२ रोजी सकाळी ११ वाजता राजभवन, मलबार हिल, मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल श्री. भगतसिंगजी कोश्यारी यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान झाला
सुरेशराव कोते हे अहमदनगर जिल्ह्यातील कोतुळ (ता अकोले )येथील रहिवासी असून दानशुर कर्तुत्व संपन्न व्यक्तिमत्व आहे
शुन्यातून विश्व निर्माण केलेले कोते साहेब सम्पूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत ते त्यांच्या साधेपणामुळे आणि मदतीला धावून जाणाऱ्या त्यांच्या . शांत, मितभाषी, प्रेमळ व्यक्तिमत्वाच्या स्वभावामुळे त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्करांनी सन्मानीत केले आहे.
अभिनव शिक्षण संस्थेला नवसंजीवनी देण्याचे महत्वपूर्ण योगदान श्री. सुरेशराव कोते यांनी दिले आहे.अनेक संस्था, वाचनालये, मंदिरे, तसेच सामाजिक उक्रमांसाठी त्यांनी आजपर्यंत अनेक वेळा योगदान दिले आहे. सामाजिक बांधिलकी जपत लिज्जत पापड या देशपातळीवरील संस्थेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते काम करत आहे रेड स्वस्तिक ,पुण्यातील लक्ष्मी बँक कोतुळ वाघापूर अकोले मूळमा ता देवस्थान अकोले येथील अभिनव शिक्षण संस्था अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर ते काम करत आहे त्यांना यापूर्वी देशांचे राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते
त्यांना आज सोमवारी हा पुरकार पुणे येथे प्रदान करण्यात आल्याने त्यांचे
अहमदनगर जिल्हा तसेच अकोले तालुक्यात अभिनंदन करण्यात येत आहे