क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या कंत्राटदार अजित नवले व पांडे यांच्यावर गुन्हा दाखलआदिवासींमध्ये संताप

अकोले : प्रतिनिधी
ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध लढा लढा देऊन आदिवासी बांधवांना न्याय देणारे व आदिवासींचे श्रद्धास्थान असणारे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी बांधकाम कंत्राटदार अजित बाकू नवले (रा पाडळणे) व शैलेंद्र गणपत पांडे (रा. अकोले) या दोघांवर राजूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोपट काकू चौधरी (रा. धामणवन) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे फिर्यादीत म्हटले की, राघोजी भांगरे यांच्या देवगावातील पुतळ्याचे तसेच परिसराचे शुभोभीकरणाचे काम अजीत नवले व शैलेंद्र पांडे हे ठेकेदार करत आहेत.
मात्र बुधवारी दर्शनाकरिता गेलो असता पुतळा
नेहमीच्या ठिकाणी दिसला नाही. विचारपूस केली असता
ठेकेदाराने कोणतीही परवानगी न घेता पुतळा परस्पर काढून टाकल्याची समजले सांगण्यात आले
. मात्र पुतळा काढण्याची परवानगी कोणी दिली, याचा माहिती पांडे यांनी दिली नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयानेही परवानगी दिलेली नसल्याचे समजले. त्यावरून या ठेकेदरांनी परवानगी नसताना पुतळा जागेवरून काढून आदिवासी महादेव कोळी समुदायाच्या दैवताचा अवमान, विटंबना केली.
,युवा नेते अमित भांगरे, दिलीप भांगरे, बाजीराव सगभोर, अनंत गाणे, तुळसाबाई भांगरे, स्वप्निल धांडे, पंढरीनाथ खाडे, पोपट चौधरी, जितेंद्र भांगरे आदीं सह अनेक कार्यकर्त्यांनी देवगाव येथे जाऊन या घटनेचा निषेध नोंदविला

देवगाव येथील क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचा
पुतळा सुशोभीकरण करण्याचा नावाखाली संबंधित ठेकेदाराने कुणाचीही परवानगी न घेता हलविल्याचा आरोप करत देवगाव ग्रामस्थानी या घटनेचा निषेध करत थेट राजूर पोलिस ठाण्यावर मोर्चा नेत ठिय्या आंदोलन केले. रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन
सुरूच होते. देवगाव व शेंडी येथील ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद ठेवत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
घटनास्थळी संगमनेर विभागाचे पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे,
सहायक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे,यांनी भेट देऊन मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे युवा नेते अमित भांगरे, सामाजिक कार्यकर्ते अनंत घाणे, माजी सरपंच दिलीप
भांगरे, स्वप्नील धांडे, मुरलीधर नानाभांगरे, विजय भांगरे, गोपीनाथ भांगरे, दीपक देशमुख यांच्यासह राजूर, शेंडी, देवगाव येथील आदिवासी संघटनांनी राजूर पोलिस ठाण्याचा परिसर दणाणून सोडला.

या घटनेची माहिती. समजताच मोठ्या संख्येने आदिवासी संघटना व ग्रामस्थ एकत्र येत गाव बंद
केले, तर शेंडी येथे युवा नेते अमित भांगरे यांनी शेंडी गाव बंद करून निषेध नोंदवत राजूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून, निवेदन देऊन संबंधित ठेकेदाराला अटक करा, या मागणीसाठी आंदोलन केले.
चौकट
•देवगाव येथे क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचे स्मारक लोक वर्गणीतून उभारले असून, पुतळा बसविण्यात आला आहे. मात्र ठेकेदाराने कुणाचीही परवानगी न घेता हा पुतळा हलवून आमच्या नव्हे,तर संपूर्ण महाराष्ट्राच्या आदिवासी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत.
– अमित भांगरे, युवा नेते, राष्ट्रवादी
देवगाव येथे क्रांतिवीर ‘राघोजी भांगरे यांचा पुतळा
अनाधिकाराने ठेकेदाराने हलविला असून, त्याच्यावर कडक कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले
जाईल.
– अनंत घाणे, सामाजिक कार्यकर्ते



