इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि. २५/०९/२०२५,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन ०३ शके १९४७
दिनांक :- २५/०९/२०२५,
वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२०,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:२३,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- अश्विन
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- तृतीया समाप्ति ०७:०७,
नक्षत्र :- स्वाती समाप्ति १९:०९,
योग :- वैधृति समाप्ति २१:५४,
करण :- वणिज समाप्ति २०:१९,
चंद्र राशि :- तुला,
रविराशि – नक्षत्र :- कन्या – उत्तरा,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- सिंह,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- वैधृति वर्ज्य दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी ०१:५१ ते ०३:२१ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
शुभ मुहूर्त — सकाळी ०६:२० ते ०७:५० पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:२१ ते ०१:५१ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०१:५१ ते ०३:२१ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०४:५२ ते ०६:२३ पर्यंत,

❀ दिन विशेष:
विनायक चतुर्थी, भद्रा २०:१९ नं., चतुर्थी श्राद्ध,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन ०३ शके १९४७
दिनांक = २५/०९/२०२५
वार = बृहस्पतीवासरे(गुरुवार)

मेष
दिवस मनासारखा घालवाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. इतरांचे गैरसमज दूर करावे लागतील. जुन्या मित्रमंडळींच्या भेटीचा योग. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

वृषभ
मनाची द्विधावस्था टाळावी. एकाच गोष्टीवर ठाम राहावे. मनातील नसती शंका काढून टाकावी. वाहन चालवताना काळजी घ्यावी. दिवसभर कामाची धांदल राहील.

मिथुन
लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. चारचौघात प्रतिष्ठा कमवाल. सावधगिरी बाळगून व्यवहार करावा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. मुलांकडून शुभ वार्ता मिळेल.

कर्क
उत्तम कौटुंबिक सौख्य राहील. आवडते पदार्थ चाखाल. परिश्रमाचे चीज होईल. मुलांबद्दलचा विश्वास दृढ होईल. आवडीच्या वस्तु खरेदी कराल.

सिंह
गुंतवणूक विचारपूर्वक करावी. संमिश्र घटना जाणवतील. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. धार्मिक गोष्टींकडे कल राहील. क्षुल्लक मुद्दा वादाचा ठरू शकतो.

कन्या
तुमच्या कलेचे कौतुक केले जाईल. क्षुल्लक कारणाने नाराज होऊ नका. निर्भीडपणे कामे पूर्ण कराल. कार्यालयीन सहकारी उत्तम साथ देतील. जोडीदाराला खुश करावे.

तूळ
मानसिक आरोग्य जपावे. ग्रहमानाची साथ लाभेल. आपले विचार ठामपणे मांडाल. गोड बोलून कार्यभाग साधाल. मनातील नसत्या कल्पना काढून टाका.

वृश्चिक
उधारी वसूल करण्याच्या मागे लागा. लोक तुमचा सल्ला विचारात घेतील. फसव्या लोकांपासून सावध राहावे. मेहनतीच्या जोरावर कामे कराल. प्रयत्न अपेक्षेप्रमाणे साथ देतील.

धनू
अति गोड पदार्थ खाणे टाळावे. तुमच्या अनुभवाचा फायदा होईल. भाग्याची उत्तम साथ मिळेल. घरात शांतता नांदेल. धार्मिक कामाकडे कल राहील.

मकर
घरासाठी खरेदी केली जाईल. चिकाटीने कामे करावीत. मौल्यवान वस्तु लाभतील. अनावश्यक खर्च संभवतात. प्रलंबित कामे मार्गी लागतील.

कुंभ
सामाजिक प्रतिष्ठा वाढीस लागेल. नातेवाईकांची खुशाली कळेल. बौद्धिक कामात लक्ष घालाल. तिखट शब्द टाळावेत. खर्च मर्यादित ठेवावा.

मीन
दिवस मनासारखा घालवाल. धडाडीने कामे पूर्ण कराल. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमचे मनोबल वाढीस लागेल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button